Udayanraje Bhosale | ‘युगपुरुषांची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’ – उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale | udayanarajes criticism of governor and mangalprabhat lodha

पुणे : बहुजननामा ऑनलाईन भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांना पदावरून काढण्यासाठी पक्षाला पत्र दिले होते. तरी देखील काहीही कारवाई झाली नसल्याने त्यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. युगपुरूषांची प्रतिमा मलीन करणाऱ्यांना कडक शिक्षा होण्यासाठी कायदे केले पाहिजेत. अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ राजकारणासाठी वापर होतो आहे. त्यांच्यावर कोणीही आक्षेपार्ह बोलत असेल, तर कोणाला राग येत नाही. महाराजांची प्रतिमा दिवसेंदिवस मलीन केली जात आहे. त्यामुळे ती जर का सुधारली नाही, तर पुढच्या पिढ्यांना महाराज तसेच होते, असे वाटेल. युगपुरूषांची प्रतिमा मलीन करणाऱ्यांना कडक शिक्षा होण्यासाठी कायदे केले पाहिजेत. अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. देशात सध्या सुरु असलेले विकृतीकरण थांबविले पाहिजे. शिवाजी महाराज यांच्यावर वेडे वाकडे बोलणे सहन झाले नाही पाहिजे. राजकीय नेत्यांनी अशा लोकांच्या विरोधात कडक भूमिका घेतल्या पाहिजेत. जर ते शांत बसत असतील, तर त्यांना शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा काहीही अधिकार नाही, असे यावेळी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) म्हणाले.

 

उदयनराजे भोसले पत्रकार परिषदेत बोलताना अचानक भावूक झाले. शिवाजी महाराजांची प्रतिमा मलीन होत असल्याचे पाहून मनाला यातना होत आहेत. जर शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि त्यांचा इतिहास मलीन होत असेल, आणि ती करणाऱ्यांवर कारवाई होत नसेल, तर विमानतळांना आणि रस्त्यांना त्यांची नावे का द्यावीत? शिवाजी महाराजांची जयंती तरी का साजरी करायची? असे प्रश्न यावेळी उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Udayanraje Bhosale | mp udayanraje bhosale become aggressive over governor bhagat singh koshyari statement regarding chhatrapati shivaji maharaj

 

हे देखील वाचा :

Rohit Shetty | रोहित शेट्टीच्या बहुचर्चित ‘सर्कस’चा टीझर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित

Sanjay Raut | राज्यपालांच्या पदमुक्त होण्याच्या चर्चेनंतर श्रेयासाठी शिवसेना सरसावली; संजय राऊत म्हणाले – ‘शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच…’

Beed Crime | पोलीस व्हॅनचे स्टेअरिंग ओढून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न, व्हॅन उलटून 4 पोलिसांसह 7 जण जखमी