बहुजननामा ऑनलाईन टीम : पाकिस्तानी मीडियाच्या सूत्रांनुसार सौदी अरेबिया काश्मीर प्रश्नावरती चर्चा करण्यासाठी मुस्लिम देशांची संघटना असलेल्या मुस्लिम सहयोग संघटनेमधील सदस्यांच्या बैठकीची तयारी करत आहेत. एका वृत्तसंस्थेनुसार, पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्या भेटीदरम्यान सौदीचे विदेश मंत्री प्रिन्स फैजल बिन फरहान अल सउद यांनी काश्मीर प्रश्नावर चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.
गुरुवारी प्रिन्स फैजल यांची पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये पाकिस्तानचे विदेश मंत्री, विदेश सचिव सोहेल महमूद, आयएसआयचे लेफ्टनंट फैज हमीद तसेच इतर वरिष्ठ अधिकारी पण आले होते. सौदी आणि पाकिस्तानच्या विदेशी मंत्र्यांनी काश्मीर मुद्द्यावर इस्लामिक सहयोग संघटनेच्या भूमिकेला घेऊन गहण चर्चा केली.
तसेच नागरिकत्व कायदा आणि एनआरसी वर विदेशी मंत्री कुरेशी यांनी सौदीच्या विदेशी मंत्र्यांसोबत संभाषण केले, असे विधान विदेशी मंत्रालयाने केले आहे. पाकिस्तानचे हित साधणाऱ्या मुद्द्यांचेच सौदी समर्थन करेल, असे सौदीच्या विदेशी मंत्र्यांनी पुन्हा एकदा सांगितले.
Visit : bahujannama.com