मुंबई : वृत्तसंस्था – Revolt RV400 एक इलेक्ट्रीक बाईक आहे. सध्या या बाईकची खूप चर्चा सुरु आहे. ही बाईक देशातील पहिली आर्टीफिशल इंटेलिजेंस लेस इलेक्ट्रीक बाईक आहे. नुकतीच ही बाईक सर्वांसमोर आली आहे. Revolt RV400 चं प्रीबुकिंग आधीपासूनच दिल्ली आणि पुण्यात सुरु होतं. याचे फिचर्स आणि किंमतीविषयी आपण जाणून घेणार आहोत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, Revolt RV400 ची संभाव्य किंमत 1 लाख रुपये असू शकते. याची प्रीबुकींग सुरु झाली आहे. ग्राहक 1000 रुपये देऊन ही बाईक बुक करू शकतात. Revolt मोटर्सने पहिल्या RV400ला मानेसर प्लांटमधून रोल आऊट केलं आहे. या प्लांटची वार्षिक क्षमता 1,20,000 बाईक्स बनवण्याची आहे. Revolt RV400 मध्ये तुम्हाला ब्लॅक आणि रेड असे दोन ऑप्शन आहेत.
Revolt RV400 मध्ये अनेक कनेक्टीव्हीटी फीचर्स सामावलेले आहेत. इतकेच नाही तर यात 4 प्रीलोडेड मोटरसायकल साऊंड्स देण्यात आले आहेत. यातून तुम्ही तुमच्या आवडीचा साऊंड निवडू शकता. यात 4जी एलटीई सीमही असणार आहे. यामुळे सर्व इंटरनेट आधारीत फीचर्स काम करतील.
सुरुवातीला ही बाईक केवळ दिल्लीतच विक्रीसाठी उपलब्ध होती. पुढे चार महिन्यानंतर अहमदाबाद, हैद्राबाद, नागपूर पुणे, बंगळुरु, चैन्नईमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Revolt RV400 पूर्ण चार्ज झाल्यानंतर 156 किमी चालते. याचा टॉप स्पीड 85 किमी प्रतितास आहे. याची खास बात अशी की, याला चार्ज करण्यासाठी कसलीही झंझट नाही. तुम्ही ही बाईक रेग्युलर 15 अँपीयर प्लग पाईंटवर चार्ज करू शकता. रिव्होल्ट पोर्टेबल बॅटरी चार्जर सोबत ऑन बोर्ड चार्जिंगचीही सुविधा आहे.