मुंबई बहुजनानामा ऑनलाईन – कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील नेत्यांनी भाजपमध्ये आज जाहिर प्रवेश केला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत निवृत्त आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणूकीवेळीदेखील ते उमेदवारीसाठी इच्छुक होते. परंतु त्यावेळी योग जुळून आले नाहीत. त्यानंतर सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी विधानसभेच्या निवडणूकीत भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी राजकिय इनिंगला सुरुवात केली आहे.
विधानसभा निवडणूकीसाठी भाजपसह सर्वच राजकिय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपकडून विधानसभेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षातून नेत्यांना पक्षात घेण्याचे समीकरण जुळवून आणले आहे. लोकसभेच्यावेळी आणि यापुर्वी पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस दलातील अधिकारी निवडणूक लढवून आपली राजकिय कारकिर्द घडविण्यासाठी इच्छुक आहेत.
साहेबराव पाटील हे नुकतेच पुणे येथून अप्पर पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त झाले आहेत. मागील ३० वर्षांपासून पोलीस दलात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांचा सेवेचा कार्यकालही पुर्ण झाला. लोकसभा निवडणूकीत ते जळगावमधून भाजपच्या तिकीटावर लढण्यास इच्छुक होते. परंतु त्यावेळी योग जुळून न आल्याने त्यांची इच्छा त्यावेळी अपूर्ण राहिली. त्यावेळी भाजपने उमेदवारी दिल्यास ते पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या रिंगणात उतरणार होते. मात्र आता निवृत्तीनंतर त्यांनी जाहीर प्रवेश केल्याने त्यांच्या राजकिय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.