मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Reserve Bank of India । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) एक मोठा निर्णय घेतला आहे. RBI कडून राज्यातील असणारी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (Dr. Shivajirao Patil Nilangekar) अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा (Bank) बँकिंग परवाना (License) रद्द करण्यात आला आहे. तर सदरची कारवाई बँकेच्या वित्तीय परिस्थितीमुळे केली असल्याची माहिती RBI ने दिली आहे. तसेच याबरोबरच, बँकेत रक्कम जमा करणे आणि पेमेंट करण्यावर देखील निर्बंध आणले असल्याचं बँकेनं सांगितलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (Dr. Shivajirao Patil Nilangekar) अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवानाच रद्द केल्याने आता बँक ठेवीदारांना पैसे देण्यास असमर्थ होईल. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे पैसे फेडू शकत नाही. यामुळेच RBI बरोबर सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे कुलसचिव यांनी देखील ही बँक बंद करून बँकेसाठी अधिकारी नेमण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
‘या’ बँकेकडे काही कमाईचं साधनच नाही –
‘सध्या डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडकडे उत्पन्नाचं कोणतंही साधन नाही.
हे बँकिंग नियमन कायदा 1949 च्या तरतुदीनुसार नाही.
तसेच, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ही ग्राहकांसाठी सुरू राहणे योग्य नाही.
बँकेला व्यवसाय वाढविण्याची परवानगी दिली तर त्याचा परिणाम ग्राहकांवर आणि सामान्य लोकांवर होणार असल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सांगितलं आहे.
या दरम्यान, मागील महिन्यात RBI ने पुण्यातील शिवाजीराव भोसले (Shivajirao Bhosale) सहकारी बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना रद्द केला होता.
RBI ने बँकिंग रेग्यूलेशन कायदा 1949 चे कलम -35 A नुसार या बँकेवर निर्बंध आणले गेले होते.
या अंतर्गत बँकेतून पैसे काढणे, जमा करणे, कर्ज देणे या व्यवहारांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) निर्बंध आणले होते.
web title: Reserve Bank of India | Dr. Shivajirao Patil Nilangekar Urban Co-operative Bank’s banking license revoked by RBI; Account holders will not be able to withdraw money.
Pune News | टुव्हीलरवरून एक नाही तर तब्बल 6 जणांचा प्रवास; पोलीस देखील चक्रावले
MLA Madhukar Thakur | माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे वाढदिवसाच्या दिवशीच निधन