नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Price Today) आज घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या दरात (Gold Rate) 0.05 टक्के घसरण झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या डिलिव्हरी सोन्याचे दर 48270 रुपये प्रति तोळा इतके झाले आहेत. आजचा सर्वोच्च दर 48298 रुपये तर निचांकी दर 48254 रुपये प्रति तोळा आहे. याशिवाय चांदीच्या दरात (Silver Price) 86 रुपयांनी वाढ झाली आहे. आज चांदीचा दर 69498 रुपये प्रति किलो इतका आहे.
ऑगस्ट 2020 च्या दराच्या तुलनेत आज 7921 रुपयांनी स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर सर्वोच्च स्तरावर पोहचले होते. 2020 मध्ये सोन्याचा दर 56191 रुपये प्रति तोळा झाले होते. आज सोन्याची वायदे किंमत 48270 रुपये प्रति तोळा आहे. 2020 च्या किमतीच्या तुलनेत आज सोने 7921 रुपयांनी स्वस्त आहे.
आंतरराष्ट्रीय सोन्याचे दर (Gold Rates in International Market)
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,824.81 डॉलर प्रति औंस आहेत. तर चांदीचे दर 0.3 टक्क्यांनी कमी होऊन 26.16 डॉलर प्रति औंसवर पोहचले आहेत. तर प्लॅटिनमचे दर 0.05 टक्क्यांनी कमी होऊन 1,123.83 डॉलरवर पोहोचले आहेत.
उद्यापर्यंत स्वस्त सोने खरेदीची संधी
सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, सरकारची सॉव्हरेन होल्ड बाँड स्कीम (Sovereign Gold Bond scheme) फायदेशीर ठरु शकते. 12 जुलैपासून सॉव्हरेन गोल्ड
बाँड स्कीम 2021-22 ची चौथी सीरिज सब्सक्रिप्शनसाठी खुली झाली आहे. या योजनेंतर्गत स्वस्त
सोन्याची विक्री होत होत आहे. ही विक्री 16 जुलै म्हणजेच उद्यापर्यंत होणार आहे. RBI ने जारी
केलेल्या सीरिजमधील सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 4807 रुपये निश्चित करण्यात आली आहे. सरकारच्या वतीने RBI सॉव्हरेन गोल्ड बाँड जारी करतं.
web title: Gold Price Today | Gold at Rs 7921 today, opportunity to buy cheap gold till tomorrow, find out today’s market price
Pune News | टुव्हीलरवरून एक नाही तर तब्बल 6 जणांचा प्रवास; पोलीस देखील चक्रावले
MLA Madhukar Thakur | माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे वाढदिवसाच्या दिवशीच निधन
Pimpri Crime News | भोसरीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; पेट्रोलपंप मालकाला अटक