बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनामुळे देशात विविध ठिकाणी तसेच राज्यात लॉकडाऊन आणि अनलॉक अशी प्रक्रिया राबविली जात आहे. या कोरोना संकटामुळे अनेकजणांना सध्या आर्थिक अडचणींना सामाना करावा लागत आहे. या काळात ज्यांनी मदत केली तेच खरे हिरो ठरले. त्यात अभिनेता सोनू सूद याचं नाव आवार्जुन घेतलं जात आहे.
लॉकडाऊनमध्ये लोकांची मदत करून सुपरहिरो ठरलेला अभिनेता सोनू सूदला एक नवीन दृष्टीकोन मिळालाय. सोनू सूद सतत गरजू लोकांना मदत करत आहे. तर अनेकांना रोजगारही मिळवून देत आहे. नुकतीच त्याने बिहारमधील एका व्यक्तीला म्हैस खरेदी करून दिलीय. ज्याची माहिती त्याने ट्विटरवरून दिलीय.
एका ट्विटर यूजरने लिहिलं होतं की, चंपारणमधील भोलाचा मुलगा आणि म्हैस पूरात वाहून गेलाय. म्हैस ही एकुलती एक त्याच्या उत्पन्नाचं साधन होती. त्याच्या नुकसानही भरपाई करण्याचा प्रयत्न सोनू सूदने केलाय. सोनू सूद आणि नीती गोयलने भोला नावाच्या व्यक्तीला म्हैस घेऊन दिलीय. यामुळे तो पैसे कमावू शकेल आणि स्वत:चं घर चालवू शकेल.
याबाबत सोनू सूदने ट्विट करून म्हंटलंय की, ’मी इतका एक्सायडेट, माझी पहिली कार खरेदी करतानाही झालो नव्हतो, जेवढा एक्सायटेड मी तुझ्यासाठी म्हैस खरेदी करताना झालो आहे. जेव्हा बिहारमध्ये येणार तेव्हा एक ग्लास म्हशीचं ताजं दूध नक्की पिणार आहे’.
अभिनेता सोनू सूदच्या या अंदाजाची त्याच्या फॅन्सने सोशल मीडियावर कौतुक केलं आहे. सोनू सूदने त्याला दररोज मदतीसाठी किती मेसेज येतात याची आकडेवारी शेअर केलीय. जी पाहून लोक थक्क झाले आहेत. तसेच सोनू सूदने एका मुलाखतीत म्हंटलंय की, तो लॉकडाऊनमध्ये मजूरांच्या स्थितीवर एक पुस्तक लिहितोय. हे पुस्तक लवकरच येईल.