नवी दिल्ली : वृत्तसंस्था – RBI New Rules | भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) बँकांच्या कर्जाच्या नियमात बदल केला आहे. RBI ने डायरेक्टर्ससाठी पर्सनल लोनच्या लिमिटमध्ये सुधारणा केली (RBI New Rules For Loan) आहे. या नियमांतर्गत बँकांचे बोर्ड डायरेक्टर्स आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी लोनचे लिमिटेशन 5 कोटी रुपये (Loan Limitation) करण्यात आले आहे. अगोदर कोणत्याही बँक डायरेक्टरसाठी पर्सनल लोनची (RBI New Rules) मर्यादा 25 लाख रुपये होती. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात…
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आरबीआयचे नवीन नियम
आरबीआयच्या सर्क्युलरमध्ये म्हटले आहे की, बँकांना स्वताच्या आणि इतर बँकांचे चेयरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर्स किंवा इतर डायरेक्टर्सचे पती किंवा पत्नी आणि अवलंबित मुलांसह कोणत्याही नातेवाईला 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज देण्याची परवानगी नाही. सोबतच म्हटले आहे की हे कोणत्याही फर्मच्या प्रकरणात सुद्धा लागू होते ज्यामध्ये पती किंवा पत्नी आणि अवलंबित मुलांशिवाय कुणीही नातेवाईक पार्टनर, प्रमुख शेयरहोल्डर किंवा डायरेक्टर आहे.
लोन घेऊन बोर्डाला माहिती देणे
आरबीआयने म्हटले आहे की, कर्ज घेणार्यांनी 25 लाख किंवा 5 कोटीपेक्षा कमी लोक सुविधांच्या प्रस्तावाला अथॉरिटीकडून मंजूरी दिली जाऊ शकते.
परंतु सर्व कागदपत्रांसह बोर्डाला सूचित केले पाहिजे. यानंतरच बोर्ड यावर निर्णय घेईल.
कर्जासाठी पदाचा दुरुपयोग
यापूर्वी अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यामध्ये डायरेक्टर्सने आपल्या कुटुंबातील सदस्यांना कर्ज देण्यासाठी आपल्या पदाचा दुरुपयोग केला आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या एमडी आणि सीईओ चंदा कोचर यांच्यासह अनेक मोठ्या व्यक्तींवर असे आरोप आहेत
की त्यांनी व्हिडियोकॉनला 3250 कोटीचे कर्ज देण्यासाठी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला होता.
यामुळे आरबीआयने नियम कठोर केले आहेत.
Web Title :- RBI New Rules | rbi new rules for loan personal loan limit for board directors of banks has been increased to 5 crores know the details
हे देखील वाचा:
Jammu and Kashmir | दहशतवाद्यांविरोधातील सर्च ऑपरेशनमध्ये जवान कृष्ण वैद्य शहीद; कृष्णा घाटी सेक्टरमध्ये चकमकीत 2 अतिरेकी ठार
Pune Rains | पुण्यात एकाच दिवसात 80 मिमीची ‘बरसात’ वडगाव शेरीत 100, गिरीवनला 149 मिमी पावसाची नोंद