श्रीनगर : वृत्त संस्था – Jammu and Kashmir | काश्मीरमधील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये सुरु असलेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान भारतीय सैन्य दलातील जवान कृष्ण वैद्य हे शहीद झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून काश्मीरमधील कृष्णा घाटी सेक्टर, बालाकोट सेक्टर आणि मनकोट सेक्टर परिसरात दहशतवाद्यांच्या विरोधात सैन्य दलाकडून मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरु आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Sepoy Krishna Vaidya lost his life during operations on 23rd July 2021 at Krishna Ghati Sector, Jammu and Kashmir: 16 Corps, Indian Army pic.twitter.com/39cVvUIQJ1
— ANI (@ANI) July 24, 2021
२३ जुलै रोजी दुपारपासून एक तुकडी कृष्णा घाटी सेक्टरमध्ये सर्च ऑपरेशन (Search Operation) करत होती. यावेळी सर्च ऑपरेशन (Search Operations) तुकडीला नेमके किती दहशतवादी लपले आहेत, याची माहिती नव्हती. यावेळी अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरवात केली. त्यात कृष्ण वैद्य हे शहीद झाले आहेत.
#UPDATE Bandipora encounter | Two unidentified terrorists killed. The operation is in progress. Details awaited: Jammu and Kashmir Police
— ANI (@ANI) July 24, 2021
जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) शनिवारी सकाळीही सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु आहे. पोलीस आणि सैन्य दलाकडून झालेल्या गोळीबार दोन दहशतवादी (terrorists) ठार झाले आहेत. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. ही चकमक अजूनही सुरु आहे.
Web Title : Jammu and Kashmir | awan Krishna Vaidya martyred in search operation against terrorists
हे देखील वाचा:
Covid Vaccination | व्हॅक्सीन घेण्यावरून एकमेकीवर तुटून पडल्या महिला, झाली जोरदार हाणामारी; ओढले एकमेकींचे केस (Video)
Pune News | वंचितांच्या विकासासाठी झटणारा सच्चा कार्यकर्ता विलास चाफेकर यांचे निधन