नवी दिल्ली : वृत्तसंस्था – RBI Issued Fraud Alert | भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा फसवणुकीबाबत इशारा जारी केला आहे. केंद्रीय बँकेने ग्राहकांना सायबर गुन्हेगारांच्या नवनवीन फ्रॉडपासून (RBI Issued Fraud Alert) सावध केले आहे. सोबत आपली वैयक्तिक माहिती कुणासोबत शेयर करण्यास मनाई केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यापूर्वी सुद्धा आरबीआयने जुन्या नोटा आणि नाण्यांच्या विक्रीबाबत ग्राहकांना सावध केले होते. सायबर गुन्हेगार अनेक प्रकारे लोकांची फसवणुक करत आहेत. या फसवणुकीपासून कसा बचाव करता येईल ते जाणून घेवूयात…
आरबीआयने हे क्रमांक शेयर करण्यास केली मनाई
आरबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट करत ग्राहकांना म्हटले आहे की, आपली बँकेची माहिती जसे की, पिन (Pin Number), सीव्हीव्ही (CVV), ओटीपी (OTP) कुणासोबत सुद्धा शेयर करू नका.
.@RBI Kehta Hai.. Stay Alert!
Do not share your bank details such as PIN, CVV, OTP with anybody posing as RBI or bank representatives. #BeAware #BeSecure#rbikehtahai #StaySafehttps://t.co/mKPAIp5rA3 pic.twitter.com/EJVIswssxz— RBI Says (@RBIsays) August 12, 2021
अशाप्रकारे होते फसवणूक
सायबर गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी बँक किंवा फायनान्शियल कंपनीचा टोल फ्री नंबर 1800
123 1234 (हा खरा क्रमांक नाही) सोबत मिळता-जुळता (800 123 1234) नंबर प्राप्त करतात.
ज्यानंतर आरोपी हा नंबर ट्रू कॉलर किंवा इतर अॅप्लिकेशनवर बँक किंवा फायनान्शियल कंपनीच्या
नावाने रजिस्टर्ड करतात.
अशावेळी जेव्हा तुम्ही बँकेला ट्रू कॉलरच्या मदतीने फोन करता तेव्हा अनेकदा हा फोन सायबर
गुन्हेगारांकडे जातो आणि ते तुमच्याकडून सर्व माहिती घेऊन सायबर गुन्हा घडवून आणतात.
फसवणुकीपासून असा करा बचाव
जर तुम्हाला बँकेत किंवा फायनान्शियल कंपनीत फोन करायचा असेल तर त्यांच्या ट्रोल फ्री नंबरची
संपूर्ण माहिती घ्या. तसेच कोणत्याही टोल फ्री नंबरवर आपल्या बँकेची माहिती शेयर करू नका.
Web Title :- rbi issued fraud alert for customers says avoid these things know about it
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Parambir Singh | परमबीर सिंग यांच्याविरोधात ‘लूकआउट’ नोटीस जारी
Asteroid | पृथ्वीवर विध्वंस करू शकतो अॅस्टरॉईड बेन्नू, NASA ने सांगितले केव्हा होऊ शकते ‘धडक’