सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – २४ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी महामेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अकबर मुजावर, शहराध्यक्ष अशोक कोळेकर, बापूसाहेब मेटकरी, विजयकुमार हत्तुरे उपस्थित होते.
२४ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, महिला व बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदामंत्री विजय शिवतारे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थितीत धनगर व मुस्लिम आरक्षणासाठी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्य शासनाकडून धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण जाहीर होण्याची शक्यता यावेळी बोलताना बंडगर यांनी व्यक्त केली.