मुंबई बहुजननामा ऑनलाईन – माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत हे वंचितच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. त्यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. ते अमरावतीतून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा सुरु आहे.
रावसाहेब शेखावत हे २००९ साली अमरावती विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा कॉंग्रेसच्या तिकीटॉवर आमदार झाले होते. त्यानंतर २०१४ मघ्ये मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. ते कॉंग्रेसमध्ये असताना त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर लोकसभा निवडणूकीत वंचितला चांगला जनाधार मिळाला आहे. त्यामुळे वंचित फॅक्टरला राज्याच्या राजकारणात महत्व आले आहे. त्यामुळे वंचित शिवाय विजय अशक्य असल्याचे लक्षात आल्यानेच शेखावत यांनी आंबेडकर यांची भेट घेतली अशी चर्चा सुरु आहे. रावसाहेब शेखावत यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्यास त्यांची ताकद नक्कीच वाढणार आहे. अमरावतीमध्ये भाजपसमोर तगडं आव्हान निर्माण होईल. परंतु त्यांनी नेमकी कोणत्या कारणासाठी भेट घेतली. हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
राज्यात विधानसभा निवडणूकीची वंचितने जोरदार तयारी सुरु केली आहे. वंचित बहुजन आघाडीने विदर्भात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर कालपर्यंत नागपूर, अमरावती आणि अकोला येथे पार पडलेल्या मुलाखतीसाठी इच्छुकांनी गर्दी केली होती. १०० हून अधिक इच्छुकांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या. वंचित फॅक्टरला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने अनेकांनी या मुलाखतीला प्रतिसाद दिला. त्यानंतर आता शेखावत यांच्या प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच्या भेटीने वेगळ्या शक्यता नाकारता येत नाहीत. असे चित्र आहे.