भंडारा : बहुजननामा ऑनलाइन – नवनिर्मित मिनी दीक्षाभूमीचा पाचवा वर्धापनदिन तथा माई रमाई जन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन सिल्ली येथे ५ फेब्रुवारीपासून ते ८ फेब्रुवारीपयंर्त सिल्ली येथील बौध्द विहार परिसरात करण्यात आले आहे. यानिमित्ताने सिल्ली येथे मिनी दीक्षाभूमीच्या पाचव्या वर्धापनदिनाची जय्यत तयारी सुरू आहे.
सिल्ली येथील नवनिर्मित ‘मिनी दीक्षाभूमी‘ ही भंडारा जिल्हा व आजूबाजूच्या परिसरातील अत्यंत आकर्षक व रमणीय वास्तू असून संपूर्ण विदर्भातील कानाकोपऱ्यातून पर्यटक या ‘मिनी दीक्षाभूमी’ ला भेट देऊन वंदन करतात. या मिनी दीक्षाभूमीचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी जागेत नियोजनपूर्वक व लोकवर्गणी तसेच श्रमदानातून नागपूरच्या दीक्षाभूमीची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली आहे.५ फेब्रुवारीला वर्धापनदिन सोहळ्याचे उद्घाटन माजी खासदार नाना पटोले यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता होणार आहे.
अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ई.झेड खोब्रागडे, डॉ. प्रा. डी.डी. वैरागडे, बबलू कटरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जि. प. सदस्य नरेश डहारे, डी.एफ. कोचे, राजू कारेमोरे, कारधा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन कंकाळे, जी. एस. कांबळे, अनिल गावंडे, सिल्लीचे सरपंच निर्भय क्षीरसागर, प्राचार्य अनमोल देशपांडे, भगवान सुखदेवे आदी उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी सकाळी ११ वाजता डॉ. प्रा. रेवाराम खोब्रागडे यांच्या अभिनयातून ‘क्रांतिबा महात्मा फुले’ या एकपात्री नाटकाचे सादरीकरण होणार आहे. तसेच रात्री ९ वाजता फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेचे महाराष्ट्राचे सुप्रसिध्द गायक अजयकुमार, नागपूर यांचा प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १२ वाजता सत्यसाई संस्था भंडारा यांच्या वतीने आरोग्य शिबिर, दुपारी १२ वाजता दरम्यान लोकशाहीर कार्तिक स्वामी मेश्राम यांचा जनजागृती कार्यक्रम, सायंकाळी ६ वाजता आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी नृत्य तथा विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता माई रमाई जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविधांगी कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प. समाज कल्याण समितीच्या सभापती रेखा वासनिक यांच्या हस्ते होईल.
प्रमुख अतिथी प्राचार्या वंदना हटवार, गटविकास अधिकारी नूतन सावंत, ॲड. सविता बेदरकर, स्नेहा गडपायले, पं.स. सदस्या प्रमिला लांजेवार, माजी सरपंच कुसुम बन्सोड, मुख्याध्यापिका कुमुदिनी साठवणे, जयश्री गजभिये, इंद्रायणी सुखदेवे, संध्या रंगारी, शेषकला गजभिये आदी उपस्थित राहणार आहेत. रात्रीला ९ वाजेपासून सुप्रसिध्द समाज प्रबोधनकार व संप्त खंजिरी वादक इंजि. भाऊ थोटे यांचा समाज प्रबोधानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शेवटी शुक्रवार ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वा. ते रात्री ९ वाजतापयंर्त गावकरी बांधवांच्या सहकार्यानेे तसेच बौध्द समिती सिल्ली यांच्या वतीने भोजनदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आयोजित कार्यक्रमाचा लाभा घ्यावा, असे आवाहन बौध्द विहार समिती सिल्लीच्या वतीने करण्यात आले आहे.