बहुजननामा ऑनलाईन टीम – राकेश यांनी मुंबई येथे आयोजित वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम २०१९ मध्ये लंडन मधील एक गुंतवणूकदारास पाकिस्तानात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. भारतातील बेरोजगारी दरावर लंडनमधील एक गुंतवणूकदार वारंवार प्रश्न विचारत होता. यावर वैतागलेल्या झुंझुनवाला यांनी गुंतवणूकदाराला सल्ला दिला की, ‘जर त्यांना भारताच्या बेरोजगारीची चिंता वाटत असेल तर त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन त्याचे पैसे गुंतवावेत’. स्टॉक मार्केटचे तज्ञ आणि भारताचे वॉरेन बफे म्हणून राकेश झुंझुनवाला प्रसिद्ध आहेत. तर गुंतवणूकदार त्यांना मार्गदर्शक मानतात.
झुंझुनवाला यांनी असा सल्ला का दिला
गेल्या २० वर्षांत झपाट्याने वाढलेली आर्थिक वाढ असूनही बेरोजगारीचे प्रमाण खूपच जास्त असल्याचे ब्रिटिश गुंतवणूकदाराने म्हंटले होते. यानंतर गुंतवणूकदाराने म्हटले की, भारताला परकीय पैशांची गरज आहे, यावर झुंझुनवाला म्हणाले, अशा शंका घेणाऱ्या लोकांकडून आम्हाला गुंतवणुकीची गरज नाही. जर तुम्हाला भारतात गुंतवणूक करायची नसेल तर तुम्ही जाऊन पाकिस्तानात गुंतवणूक करू शकता. यावर ब्रिटनच्या गुंतवणूकदाराने उत्तरात सांगितले की मुंबईबाहेरही भारत आहे. यावर झुंझुनवाला म्हणाले की, बेरोजगारीवर मत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वेगवान आर्थिक वाढ.
भारतात परदेशी गुंतवणूकदारांना परत यावे लागेल
राकेश झुंझुनवाला यांनी फोरममध्ये म्हटले आहे की, कॉर्पोरेट टॅक्समध्ये मोठी घसरण झाल्यानंतर परदेशी गुंतवणूकदारांना भारतात परत यावे लागेल. ज्या गुंतवणूकदारांना परतावा हवा आहे तो गुंतवणूकदार भारताकडे वळतील.
Visit : bahujannama.com