नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज ठाकरे मोदींच्या विरोधात प्रचार करत राज्यभरात दहा सभा घेणार आहेत. दरम्यान, नुकतेच नांदेड शहरात मोदी यांची प्रचार सभा पार पडली होती . यापूर्वीच राज ठाकरे यांनी भाजपला मतदान करू नका असं आवाहन केलं आहे.त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांची सभा १४ एप्रिल रोजी नांदेडमध्ये होणार आहे. ते नेमकी कोणत्या विषयावर बोलतील यावरून कार्यकर्त्यामध्ये जोरात चर्चा सुरु आहे .पाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांचे मुंबईत सभा घेतली त्यात त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवत सरकारच्या अनेक योजनांची खिल्ली उडवली होती . या सभेला श्रोत्यानी भरभरून दाद दिली होती.
दरम्यान राज ठाकरे यांनी मोदी विरोधात सभा घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर ते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्लात राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. ठाकरेंचा अजेंडा भाजपच्या विरोधात असल्यामुळे याचा सरळसरळ फायदा काँग्रेसला होणार असल्याची चर्चा सुरु आहे .राज ठाकरे यांच्या सभांकडे राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळे राज यांच्या मोदी विरोधाचा फायदा हा आघाडीला होणार का? हे पाहावं लागणार आहे.