मुंबई बहुजननामा ऑनलाइन : दादर येथील कोहिनुर मिल जमिनीच्या खरेदी – विक्री संदर्भात राज ठाकरे यांना ईडीने चौकशीसाठी बोलाविले आहे. त्यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या सोबत ईडीच्या कार्यालयाजवळ उपस्थित आहे. यावेळी प्रतिक्रिया देत शर्मिला ठाकरे म्हणाल्या कि, ‘मी राज ठाकरे यांची पत्नी आहे, त्यामुळे ईडीच्या चौकशीसाठीच काय तर सात जन्म मी त्यांच्यासोबत असेल .”
काही वेळापूर्वीच राज ठाकरे हे कोहिनुर मिलच्या जमिनीसंदर्भात चौकशीसाठी ईडी कार्यलयात असून त्यांचे संपूर्ण कुटुंब चौकशी संपेपर्यंत कार्यलयाजवळच्या ग्रँड हॉटेल मध्ये थांबले आहेत. त्यांच्यासोबत मनसेचे काही वरिष्ठ नेते देखील त्या हॉटेलमध्ये थांबले आहे. राज ठाकरे सकाळीच आपल्या कृष्णकुंज या निवास्थानावरून ईडी कार्यालयाकडे रवाना झाले.
त्यांच्यासोबतच त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे , मुलगा अमित ठाकरे, मुलगी उर्वशी ठाकरे , सून मिताली देखील उपस्थित झाले. कार्यालयापासून काही अंतरावर गाड्या थांबवण्यात आल्या, राज हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेले असून त्यांचे कुटुंबीय जवळच्या हॉटेल मध्ये थांबले आहे. राज ठाकरे यांचे पार्टनर उन्मेष जोशी यांची चौकशी आठ तासांनपेक्षा जास्त वेळ चालली. त्यामुळे राज यांच्या चौकशीला देखील अधिक वेळ लागू शकतो. त्यावेळी शर्मिला ठाकरे यांनी हि प्रतिक्रिया दिली.