बहुजननामा ऑनलाइन – कोहिनुर मिल प्रकरणाच्या चौकशीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे अंमलबजावणी संचालनालयच्या कार्यालयात आज (ता. २२) हजर राहणार आहेत. यावर माध्यमांशी बोलताना “राजकारण फार काळ टिकत नाही. बहु भी कभी सास बनती है. ” असे म्हणत मनसेचे बाळा नांदगावकर यांनी विरोधकांवर निशाना साधला.
नांदगावकर राज यांच्या कृष्णरकुंज या निवासस्थानी गेले आहेत. सुरक्षेच्या कारणास्ताव राज यांच्या घराच्या परिसरात आणि ईडीच्या कार्यालयाबाहेर पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनाही ताब्यात घेण्यात आले असून राज्यभरातील मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीसी पाठविण्यात आल्या आहेत. शिवाय जमावबंदीचे आदेशही देण्यात आले आहेत.