बहुजननामा ऑनलाईन – पाकिस्तानमध्ये शीख मुलीचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा मुद्दा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या ननकाना साहिबमध्ये शीख मुलीचे अपहरण आणि धर्मांतर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आवाहन पंजाबचे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केले आहे.
याबाबत ते पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्याशीही बोलणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील नानकाना साहिब येथे शीख मुलीचे अपहरण करुन तिचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर जबरदस्तीने धर्मांतर केल्यावर मुलीचे एका मुस्लिम मुलाशी जबरदस्तीने लग्नही लावण्यात आले.
दरम्यान, मुलीच्या लग्नाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात मुलगी एका मुलाच्या शेजारी बसलेली दिसत आहे. जगजित कौर असे या मुलीचे नाव असून ती कोणत्याही दडपणाशिवाय मुलाशी लग्न करीत असल्याचे ती बोलत आहे. मात्र मुलगी पळवून नेल्याबद्दल काहीच बोलले जात नसल्याची तक्रार दाखल केली आहे.
Shocking incident of a Sikh girl being kidnapped & forced to convert to Islam in Nankana Sahib, Pakistan. Call upon @ImranKhanPTI to take firm and immediate action against the perpetrators. Request @DrSJaishankar to strongly take up the issue with his counterpart at the earliest. pic.twitter.com/hpHvD9kkEJ
— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) August 30, 2019