बहुजननामा ऑनलाइन टीम – पूर्ववैमनस्यातून तरुणावर सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी कोयत्याने सपासप वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ( incident in Karvenagar)केल्याचा प्रकार कर्वेनगर भागात घडली आहे. रात्री हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी रवींद्र वामन ढोले (वय 19, वारजे), सचिन दिलीप डोंगरे (वय 21, रा. कर्वेनगर गल्ली 5) व आकाश दिलीप डोंगरे (वय 23) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत संकेत कंधारे (वय 23) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यात संकेत यांचा भाऊ हर्षल कंधारे (वय 25) हा गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. दरम्यान त्याची आणि आरोपींची ओळख आहे. यातील आकाश याच्यावर एक अदखलपात्र गुन्हा असून, इतर दोघे सराईत गुन्हेगार आहेत.
दरम्यान हर्षल आणि आरोपींची काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यावरूनच काल रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास हर्षल हा कर्वेनगर येथे थांबला असता. आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी पून्हा वाद घालत डोक्यात कोयत्याने तसेच तीक्ष्ण हत्याराने हातावर सपासप वारकरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती मिळताच तिघांना पोलिसांनी पकडले असून, त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बापू रायकर हे करत आहेत.