बहुजननामा ऑनलाइन टीम – रोकड घेऊन कार्यालयात जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला तिघांनी अडवून लुटल्याचा प्रकार हडपसर परिसरात घडला(cash looted) आहे. खिशातील 65 हजार रुपयांची रोकड टोळक्याने नेली आहे. मध्यरात्री हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी पाराप्पा बनसोडे (वय 30, मुंढवा) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील तीन अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे हडपसर परिसरातील माळवाडी भागात ऑफिस आहे. परवा मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास ते सिरम कंपनीकडून कॅनॉलरोडने माळवाडीकडे जात होते. त्याच्याकडे 60 हजार रुपयांची रोकड होती. ते दुचाकीवर जात असताना अचानक दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना अडविले. धमकावत खिशातील 60 हजार रुपयांची रोकड काढली. तसेच सिरमच्या दिशेने पसार झाले.फिर्यादी यांनी आरडाओरडा केला. पण रात्रीची वेळ असल्याने कोणीही मदतीला आले नाही. यानंतर त्यांनी पोलीसाना घटनेची माहिती दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध करण्यास सुरुवात केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक माने हे करत आहेत.