बहुजननामा ऑनलाइन टीम – शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात दुचाकी पार्क करून थांबलेल्या तरुणाची २४ हजारांची सोन्याची चेन हिसकाविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.(Youths arrested in Shivajinagar) या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केले.
सनी छगन ससाणे (वय २०) आणि अनिल मच्छिंद्र सावंत (वय ३० रा. कामगार पुतळा, शिवाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विवेक नगरे (वय २०) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रात्री पावणेआठच्या सुमारास विवेक न्यायालय परिसरात दुचाकी पार्क करून थांबले होते. त्यावेळी तेथे आलेल्या सनी आणि अनिलने विवेकला धक्काबुक्की करून गळ्यातील २४ हजारांची सोन्याची चेन हिसकावून नेली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी दोघांना अटक केली. अधिक तपास सहायक निरीक्षक आर. जे. मुंढे करीत आहेत.