बहुजननामा ऑनलाइन टीम – शहरात दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. एक कात्रज भागात खासगी बसने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू(accidents) झाला, तर दुसरी हडपसर परिसरात घडली आहे.
श्रीकांत निवृत्ती पवार (वय 43, रा. शिवगोरक्ष विहार, टेल्को कॉलनी, आंबेगाव बुद्रुक) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बस चालक अमरेश मनोहर गुंजटे (वय ३०,रा. बसवकल्याण, बिदर, कर्नाटक) याला अटक केली आहे. पोलीस शिपाई अजित कोकरे यांनी भारती विद्याापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हे खासगी कंपनीत काम करतात. ते सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कात्रज बाह्यवळण मार्गावरून दुचाकीवरून जात होते. यावेळी आंबेगाव बुद्रुक परिसरात भरधाव बसच्या धडकेने पवार यांना जोरात धडक दिली. यात पवार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
तर दुसरा अपघात हडपसरजवळील मांजरी येथे झाला आहे. भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. अनिल रामप्रसाद राजभर (वय 26,रा. दीपकनगर, गोपाळपट्टी, मांजरी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी सकाळी दहाच्या सुमारास राजभर हे मांजरी येथून दुचाकीने जात होते. यावेळी त्यांना ट्रकने जोरात धडक दिली. या अपघातात अनिल राजभर यांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता पसार झाला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रक चालकाविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.