बहुजननामा ऑनलाइन – इमारतीखाली दारु पीत बसलेल्यांविरुद्ध कारवाईसाठी(Three arrested) गेलेल्या पोलीसाचे चित्रीकरण करून ते व्हायरल करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी तिघांना (Three arrested)अटक केली.
रमण शिशिरकुमार सेठ (वय २९, रा. दौलत पार्वâ सोसायटी), आकाश सुरेश सिंग राणा (वय २९, रा. येरवडा) व गुनगुन लोशाली (वय २४,रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस नाईक दत्ता गेंगजे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास औंधमधील दौलत सोसायटी परिसरात काही तरुण दारु पीत असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. ही माहिती चतुशृंगी पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलीस नाईक दत्ता व सहकारी याठिकाणी गेले. त्यावेळी रमण, आकाश आणि गुनगुन हे दारू पिलेले दिसून आले. त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच आरडा-ओरडा करीत मोबाईलमध्ये छायाचित्रण केले. ते प्रसारित करण्याची धमकी देउन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अधिक तपास सहायक निरीक्षक राजेंद्र दहिफळे करीत आहेत.