पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Swimming Pool | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील जलतरण तलाव (Pune Swimming Pool) बंद करण्यात आले आहेत. मात्र, खेळाडूंनी सराव करण्यासाठी जलतरण तलाव सुरु करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. आज कोरोना (Corona) आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील खेळाडूंना सराव करण्यासाठी जलतरण तलाव खुले करण्यात आले आहेत. परंतु खेळाडूंनी ‘कोरोना’ लसीचे दोन डोस घेतलेले असले पाहिजेत असे अजित पवार यांनी सांगितले.
पुण्यातील जलतरण तलावामध्ये राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेतलेल्या जलतरणपटूंना सराव करता यावा यासाठी अजित पवार यांनी आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी खेळाडूंना (Players) या ठिकाणी सराव (Practice) करण्यास परवानगी दिली असल्याचे सांगत संबंधित खेळाडूने लसीचे (vaccine) दोन डोस घेतलेले असले पाहिजेत असे सांगितले. त्यामुळे खेळाडूंना जलतरण तलावात सराव करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, ते फक्त लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी खुले करण्यात येणार आहेत. 18 वर्षाच्या खालील मुलांसाठी जलतरण तलावात सराव करण्यासाठी प्रवेश नसणार आहे असा याचा अर्थ आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
विसर्जनाच्या दिवशी हॉटेल्स सुरु राहणार
पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, विसर्जनाच्या (ganesh visarjan) दिवशी दुकाने बंद राहणार आहे. असे असले तरी हॉटेल (Hotel) आणि रेस्टॉरंट (restaurants) सुरुच राहतील. कोरोना नियंत्रणात आहे. मात्र, गणेशोत्सावानंतर काय होणार याची माहिती नाही. परिस्थिती आटोक्यात राहिली, तर आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत निर्बंध जैसे थे राहतील. परिस्थिती सुधारल्यास 2 ऑक्टोबर पासून पुण्यातील निर्बंधाबाबत पुढील निर्णय घेतले जातील, असेही अजित पवार यांनी सांगितले.
web title: Pune swimming pool swimming pool in pune open but ajit pawar.
Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! SIM card बाबत ‘हा’ नियम बदलला, जाणून घ्या