सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – Pune-Solapur News ।सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील तडीपार असलेल्या नगरसेवक पुत्राने त्याच्या साथीदारासह एका व्यक्तीस टुव्हीलरला धडक देऊन त्याला मारहाण देखील केली. या मारहाण प्रकरणानंतर ते दोघे फरार (Absconding) झाले होते. पोलीस त्या दोघांच्या शोधात होते. नंतर विजापूर नाका पोलिसांनी त्यांना पुण्यातून (Pune) ताब्यात घेतले आहे. विकी जाधव (रा. सेेटलमेंट, सोलापूर) असं नगरसेवक पुत्राचे नाव आहे. तर संदीप राम गायकवाड (रा. सेटलमेंट, सोलापूर) असं विकीच्या मित्राचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, विकी जाधव (Vicky Jadhav) याला सोलापूर शहर आयुक्तालय (Solapur City Commissionerate) पोलिसांकडून शहरातून तडीपार करण्यात आले होते. तर, तडीपारचा आदेश असताना सुद्धा विकीने 16 मार्च (2021) मध्ये एका नागरिकाच्या दुचाकीस धडक दिली होती. तसेच त्याला धडक देऊन तू मला ओळखत नाही का ? मी कोण आहे, असं म्हणत शिवीगाळ आणि दमदाटी केली. त्यानंतर त्या व्यक्तीला दगडाने मारहाण देखील केली. मारहाण करून विकी हा त्याच्या साथीदारासह पसार झाला होता. या मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीने याप्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात (Vijapur Naka Police Station) तक्रार दाखल केली. या फिर्यादीवरून त्या दोघांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल झाला होता.
दरम्यान, विजापूर नाका पोलिसांनी (Vijapur Naka Police Station) विकी जाधव (Vicky Jadhav) याची माहिती काढल्यानंतर तो पुण्यात असल्याचे समजताच, पोलीस त्या स्थानी पोहचले. विकी आणि त्याचा साथीदार संदीप गायकवाड या दोघांना पुण्यातून ताब्यात घेऊन सोलापूर येथे आणले आहे. तर, विकी याच्यावर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये खंडणी, मारहाण करणे, शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण, लुटमार करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा अनेक प्रकारची गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्याचे (Vijapur Naka Police Station) वरिष्ठ पीआय उदयसिंह पाटील, एपीआय शितलकुमार कोल्हाळ, सहायक फौजदार संजय मोरे, पोलिस हवालदार राजकुमार तोळणूरे, श्रीरंग खांडेकर,
पोलिस नाईक शिवानंद भिमदे, अनिल गवसाने, पिंटू जाधव, अतिष पाटील, इम्रान जमादार, लखन माळी यांनी ही कारवाई केली आहे.
Web Title : Pune-Solapur News | Son of Solapur corporator arrested in Pune.
Hingoli News । चालकाला ओढ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आईसह 7 वर्षाचा मुलगा गेला वाहून