पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Sinhagad Road Crime | एका अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रोड परिसरात घडली आहे. दहा वर्षाच्या मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) अटक अटक करून त्याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार (पॉक्सो) गुन्हा (POCSO Act) दाखल केला आहे. ही घटना रविवारी (दि.31 मार्च) सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत पीडित मुलीच्या 35 वर्षीय आईने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अविनाश पवार (रा. समर्थनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड) याच्यावर आयपीसी 376(3), 376(जे)(एल), 376 (अ)(ब), 323, 504, 506, पोक्सो कलम 3,4 (एम), 5(के), 6, 7, 8, 9 (के)(एम)10 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन आणि मतिमंद असल्याचे माहित असताना देखील तिला दमदाटी करुन घराच्या बाजूला असलेल्या जिन्या खाली घेऊन गेला. त्याठिकाणी आरोपीने तिच्या सोबत अश्लील वर्तन केले. त्यावेळी मुलीने विरोध केला असता आरोपीने त्याच्या डोक्यावर बुक्की मारुन खाली पाडले. त्याचवेळी घराजवळ राहणाऱ्या मुलाने हा प्रकार पाहिल्यानंतर आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आरोपीने घाबरून तेथून पळून गेला.
काहीवेळाने आरोपी पुन्हा आला. त्याने पीडित मुलीला अश्लील शिवीगाळ करुन याबाबत कोणाला काही सांगून नको अशी धमकी देऊन तिला मारहाण करुन पळून गेला. हा प्रकार पीडित मुलीच्या आईला समजल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपीला बड्या ठोकल्या. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय (PSI Suresh Jaybhaye) करीत आहेत.
Mumbai To Pune Cabs | मुंबई ते नाशिक, शिर्डी, पुणे प्रवास महागणार, जाणून घ्या नवे दर