Pune Bhimpura Camp Crime | पुणे : पाण्यावरुन वाद, घरात घुसुन मारहाण करुन पाडले दात

marhan

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Bhimpura Camp Crime | घरातील पाण्याचा नळ सुरु ठेवल्याच्या कारणावरुन वाद झाल्याने दोघांनी घरात घुसून एकाला बेदम मारहाण करुन दात पडले. हा प्रकार भिमपुरा कॅम्प पुणे येथे शनिवारी (दि.30 मार्च) रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मानस आनंद भौमी (रा. भिमपुरा, मुळ रा. दासपूर, पश्चिम बंगाल) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी युसुफ हसन शेख (वय-28) व उमन जाकीब शेख (वय-20 दोघे रा. भिमपुरा) यांच्यावर आयपीसी 452, 325, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या शेजारी राहतात. आरोपी त्याच्या घरातील पाण्याचा नळ चालून ठेवत असल्याने फिर्यादी यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी याबाबत विचारणा केली. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच घरात घुसून लाथाबुक्क्यांनी तोंडावर, डोळ्यावर ठोसे मारले. यात फिर्यादी यांचे दात पडले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे (PSI Rahul Ghadge) करीत आहेत.

पोरांना टीप देण्याच्या संशयावरुन मारहाण

कात्रज (Katraj) : पोरांना टीप देतो या कारणावरुन दोघांनी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला शिवीगाळ करुन पट्ट्याने व गॅस सिलेंडरच्या पाईपने बेदम मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार 27 मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास सच्चाई माता डोंगरावर घडला. याबाबत कोंढवा बुद्रुक (Kondhwa Budruk) येथे राहणाऱ्या 16 वर्षाच्या मुलाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bhrati Vidyapeeth Police) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी मृणांक जाधव व रिहाण शेख (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर आयपीसी 324, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक के.एन. आखुटे (API KN Aakhute) करीत आहेत.

Pune Crime News | पुणे : रहिवासी इमारतीत दरोडा टाकण्याच्या तयारी असलेली टोळी गजाआड