पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Sinhagad Road Crime | चारचाकी गाडीचा किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून दुचाकी चालकाने कार चालकाला बांबुने मारहाण केली. तसेच चारचाकी गाडीच्या काचेवर सिमेंट ब्लॉक मारुन काच फोडून तसेच बोनेटवर लाकडी बांबू मारुन नुकसान केले. हा प्रकार मंगळवारी (दि.12) रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास सिंहगड रोडवरील आशा हॉटेल चौकाजवळ घडला.
याबाबत दयानंद मदन जगताप (वय-41 रा. अमृता अपार्टमेंट जवळ, गंधार बंगलो, हिंगणे खुर्द, पुणे) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन स्वप्नील नारायण फाले (वय-27 रा. हनुमान नगर, दत्तवाडी, पुणे) याच्यावर आयपीसी 324, 341, 427, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या चारचाकी (एमएच 12 व्हिक्यु 4879) मधून हिंगणे येथे घरी जात होते. त्यावेळी गंजवे चौकात त्यांच्या गाडीचा किरकोळ धक्का आरोपीच्या दुचाकीला लागला. या कारणावरुन आरोपीने आशा हॉटेल चौकाजवळ फिर्यादी यांची गाडी रस्त्यामध्ये आडवली. फिर्यादी यांना शिवीगाळ करुन फिर्यादीच्या गाडीवर रस्त्याच्या कडेला पडलेला ब्लॉक फेकून मारुन काच फोडली. लाकडी बांबुने गाडीच्या बोनेटवर जोरात मारुन बोनेटचा पत्रा वाकवून नुकसान केले. तसेच फिर्यादी यांना गाडीतून बाहेर ओढून आरोपीने हाताने व लाकडी बांबूने मारहाण करुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.