पुणे : बहुजननामा ऑनलाईन – रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये जाण्यास नकार दिल्याने टोळक्याने सुपरवायझरला बेदम मारहाण केल्याची घटना भारती विद्यापीठ रुग्णालयात घडला आहे. याप्रकरणी उत्तमराव तारीहळकर (वय 47) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नासीर शेख (वय 50) यांच्यासह 5 ते 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भारती विद्यापीठ रुग्णालयात सुपरवायझर आहेत. यादरम्यान दुपारी नासीर शेख हा रुग्णालयाच्या गेटसमोर आले. तर मला बाहेर मारहाण झाली आहे, मला आत जाऊद्या असे म्हणाला. पण, फिर्यादी यांनी त्याला पोलीस चौकीत जा असे सांगितले.त्यावेळी त्याने आत जायचे असल्याचे सांगत इतर 5 ते 6 जणांना बोलावून घेतले. तसेच गोंधळ घातला. तर इमर्जन्सी वॉर्डात जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी फिर्यादी यांनी अडविले असता त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली आहे. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.