पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Police – PSI Suspended | पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीकडून 50 हजार रुपये घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. अरविंद शिंदे (PSI Arvind Shinde) असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. अरविंद शिंदे हे अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) कार्यरत असून ते डहाणूकर पोलीस चौकी (Dahanukar Police Chowki) अधिकारी म्हणून काम करतात. कामात कसुरी केल्याचा ठपका ठेवत शिंदे यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्या निलंबनाचे (PSI Arvind Shinde Suspended) आदेश अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale) यांनी गुरुवारी (दि.9) काढले आहेत. (Pune Police – PSI Suspended)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
घराच्या मालकी हक्कावरुन अलंकार पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील आरोपीला मेसेज करुन पोलीस चौकीत बोलावून घेत 50 हजार रुपये घेतल्याचे आढळून आले. तसेच दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडे गुन्ह्याचा तपास असताना दाखल गुनह्यातील आरोपींना अटक करण्याची भिती घालून अरविंद शिंदे यांनी पैसे घेतले. शिंदे यांनी अधिकाराचा गैरवापर करुन पोलीस खात्याची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. (Pune Police – PSI Suspended)
पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यातील (Maharashtra Civil Service Act)
नियमांचे उल्लंघन (Violation of Rules) केले आहे. त्यामुळे पुणे पोलीस (Pune Police) खात्याची
प्रतिमा मलीन झाली आहे. निलंबन कालावधीत खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलंकार पोलीस स्टेशन यांना निलंबन काळात खाजगी नोकरी किंवा धंदा करत नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. प्रमाणपत्र दिल्यानंतर निर्वाह भत्ता दिला जाईल.
Web Title : Pune Police – PSI Suspended | Hasty suspension of police sub-inspector who took 50 thousand rupees from the accused
हे देखील वाचा :
Kushal Badrike | कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाला “नात्यांची, स्वप्नांची नुसती राख…”