पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | कंपनीतील हाताखाली काम करणार्या तरुणीवर बलात्कार (Rape in Pune) करुन तिला धमकावून तिच्याकडून पैसे उकळणार्या उच्च शिक्षित तरुणाला न्यायालयाने 7 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. हा खटला लव जिहादचा (Love Jihad) असल्याचा युक्तीवाद सरकार पक्षाच्या वतीने करण्यात आला होता. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गुलाने (Additional Sessions Judge SS Gulane) यांनी हा निकाल दिला. इस्माईल अब्दुल रहेमान करजगी Ismail Abdul Rahman Karjagi (वय ४२, रा. सोलापूर – Solapur) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. आरोपीला ७ वर्षे सक्तमजुरी व ७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
आरोपी इस्माईल करजगी व पिडित महिला एकाच कंपनीमध्ये २०१० मध्ये नोकरीला होते. करजगी हा उच्च पदावर असून पिडित महिला त्याच्या हाताखाली कामाला होती. त्याने या महिलेकडे हात उसने पैसे मागितले होते. महिलेने वेळोवेळी त्याच्या खात्यात पैसे भरले होते. घटनेच्या दिवशी करजगीने या महिलेला सांगितले की, त्याची एक मैत्रिण सिंहगड रोड येथील सदनिकेवर येणार आहे. तू पण चल असे खोटे बोलून तिला तो घेऊन गेला. तेथे कोणीही नव्हते. तिथे आरोपीने पिडितेला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावून तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, पिडित महिलेचे लग्न झाले. उच्च शिक्षित असलेल्या पिडितेच्या पतीला आरोपीने मेल पाठवून त्यात आरोपी व पिडितेचा त्यांच्या कार्यालयातील नोकरीच्या ठिकाणाचा एका कार्यक्रमाचा फोटो होता. त्यात त्याने ‘‘ये तो अभी शुरुवात है, अभी तो बहुत फोटो और व्हिडिओ बाकी है’’ असे म्हटले व पैशांची मागणी केली होती. (Pune Crime News)
पतीने दिला विश्वास
या मेलनंतर पतीने तिला खरा प्रकार काय असे विचारल्यावर तिने आरोपी कसा ब्लॅकमेक करतो, धमक्या देतो, कुटुंबियांना उडवून टाकण्याच्या धमक्या देतो, पिडित महिलेच्या बहिणीचे लग्न ठरलेले असताना तिचे लग्न होऊ देणार नाही, असे धमक्या देत असल्याने घाबरुन हा प्रकार सांगितला नसल्याचे पतीला सांगितले. हा सर्व प्रकार तिच्या पतीच्या लक्षात आल्याने तो स्वत: तिला घेऊन हवेली पोलीस ठाण्यात (Haveli Police Station) आला. ६ फेब्रुवारी २०१० रोजी फिर्याद दिली. (Pune Court News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने अॅड. पुष्कर सप्रे (Adv. Pushkar Sapre) व पिडितेच्या वतीने अॅड. मिलिंद पवार (Adv. Milind Pawar) व अॅड. अजय ताकवणे (Adv. Ajay Takwane) यांनी काम पाहिले. त्यांनी ११ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या.
अॅड. मिलिंद पवार यांनी न्यायालयात युक्तीवाद केला की, पीडित महिला ही सदाशिव पेठ पुणे येथील एका नामांकित, सुशिक्षित व उच्चभ्रू घरातील आहे. आरोपी हा मूळचा सोलापूरचा गुंड प्रवृत्तीचा आहे.
वरील आरोपीला उच्च न्यायालयाने (High Court) जामीन देताना फक्त तारखे पुरते पुणे न्यायालयात
येण्याचे आदेश पारित केले होते. आरोपी याने ब्लॅकमेल करणे बंदूक दाखवून पीडीतेवर बलात्कार करणे,
वेळोवेळी पैसे उकळणे, जिवे मारायच्या धमक्या देणे, उच्चशिक्षित, उच्यभ्रू मुलींना, महिलांना ब्लॅकमेल
करून अत्याचार करणे म्हणून हा सदरचा खटला हा लव जिहादचा खटला आहे,
आरोपीने अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी.
अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
न्यायालय समोर शिक्षा सुनावल्यानंतर मी मुस्लिम आहे म्हणून मला शिक्षा सुनावली अशा प्रकारचे
बेजबाबदार बोलणं आरोपींचे वर्तन बरोबर नाही. म्हणून केलेल्या गुन्ह्याची त्याला शिक्षा व्हायला पाहिजे
असा युक्तीवाद सरकारी वकील अॅड. पुष्कर सप्रे व पिडितीचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी लेखी स्वरूपात केला.
युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला सात वर्ष सक्तमजुरीची व रुपये सात हजार दंडाची शिक्षा सुनावली.
पतीची साथ
पिडित महिलेचा पती याने हा प्रकार समजल्यावर तिच्या पाठीशी उभा राहिला.
दरम्यान हा खटला रेंगाळला. खटल्याची सुनावणी सुरु झाली तेव्हा पिडितेचा पती अमेरिकेत होता.
त्याने तेथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदविली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Pune Crime News | Argument that it is a case of ‘Love Jihad’! 7 years hard labor for highly educated youth in rape and extortion case
हे देखील वाचा :
Kushal Badrike | कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाला “नात्यांची, स्वप्नांची नुसती राख…”