बहुजननामा ऑनलाईन – ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे अभिनेता आणि हास्य कलाकार कुशल बद्रिके (Kushal Badrike) आज प्रत्येकाच्या घरात पोहोचला आहे. कुशालने आजवर त्याच्या अभिनयाने सर्वांना पोट धरून हसायला लावले आहे. कुशल नेहमीच समाजात घडणाऱ्या विविध गोष्टींवर स्पष्टपणे मत व्यक्त करत असतो. कुशलची पोस्ट सोशल मीडियावर नेहमी चर्चेचा विषय बनत असतात. कुशलने (Kushal Badrike) होलिका दहनबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या सर्वत्र त्याच्या पोस्टची चर्चा होताना दिसत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कुशलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तो पाठमोरा उभा राहून होलिका दहन पाहताना दिसत आहे. तर फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये म्हटले की, “आपल्या सगळ्यांमध्ये काही ना काही जळत असतं…… पृथ्वीच्या पोटातला लावा जसा धगधगत असतो तसा आपल्या मनात होत असतं. हे खूप त्रासदायक आणि भयंकर ही आहे. या जळणातून असं वाटतं की ही आग आता आपल्याला संपून टाकेल आणि हाती राहील ती नुसती राख…… नात्यांची, स्वप्नांची……. पण आपण देखील राखेतून जन्म घेणारे “Phoenix पक्षी आहोत. मृत्यू पलीकडे जाऊन स्वप्न पाहणारे, शोधणारे दररोज नवीन स्वप्न घेऊन उदयाला येणारे सूर्य आहोत आपण. आपल्याला जाळून टाकण्याची ताकद या आगीत नाही. ही आग आपल्यातली तेज मध्ये विलीन होऊन संपून जाणारी आहे”.
सध्या कुशल बद्रिकेची (Kushal Badrike) ही पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
अनेकांनी यावर कमेंट देखील केले आहे. कुशलच्या या पोस्टवर कौतुकांचा वर्षाव होताना दिसत आहे.
कुशल बद्रिकेच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास तो सध्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे
मनोरंजन करताना दिसत आहे. कुशलने आजवर ‘पांडू’,’जत्रा’, ‘स्लॅमबूक’, ‘डावपेच’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’
अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Kushal Badrike | marathi actor kushal badrike share holika dahan photo see instagram post
हे देखील वाचा :
Parbhani Crime News | तुझ्या मैत्रिणीसोबत आमची सेटिंग लावून दे म्हणत आरोपींकडून मुलीचा विनयभंग