मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Budget 2023 | राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Finance Minister Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी राज्याचा 2023 आणि 2024 चा अर्थसंकल्प सादर केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2023) घोषणांचा पाऊस पडला आहे. अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना (Farmers) मोठा दिलासा देण्यात आला आहे. तर धनगर समाजाला (Dhangar Community) बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेकाचे 350 वं वर्ष असल्याने या महोत्सवासाठी 350 कोटींची तरतुद करण्यात आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सन्मान आपल्या युगपुरुषाचा, ठेवू या आदर्श शिवरायांचा!
– छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये
– आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान: 50 कोटी
– मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने : 250 कोटी रुपये
– शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन : 300 कोटी रुपये
महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार
– 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
– 22 योजनांचे एकत्रिकरण, मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समिती मार्फत अंमलबजावणी
– महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार
– 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
– अहमदनगर येथे मुख्यालय असणार
– राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत (Raje Yashwantrao Holkar in Mahamesh Yojana) मेंढीपालनासाठी भरीव निधी
Web Title : Maharashtra Budget 2023 | big announcement from Devendra Fadnavis in the budget
हे देखील वाचा :
Maharashtra Budget 2023 | राज्याच्या अर्थसंकल्पावर विरोधकांच्या प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं?
Udyogini Pride Award | जागतिक महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा उद्योगिनी प्राईड अवार्डने सन्मान