पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune PMC Property Tax | पुणे महापालिकेकडून मिळकत करातून देण्यात येणारी 40 टक्के सवलत रद्द करण्यात आली होती. दरम्यान, महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) आमदारांनी याबाबत विधानसभेच्या पायर्यांवर आंदोलन केले होते. त्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) आणि चेतन तुपे (MLA Chetan Tupe) यांच्यासह इतरांनी सहभाग घेतला होता. तर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वाखाली आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal), भीमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir), सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole), माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले होते. त्यावेळी या संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीमध्ये 40 टक्के मिळकतकराची सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune PMC Property Tax)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मिळतकरात पुन्हा ४० टक्के सूट मिळणार,
पुणेकरांची अतिरिक्त करातून सुटका होणार !४० टक्के मिळकत कर सलवत कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आणि तीन पट शास्तीकर रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री मा.श्री. @mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री मा.श्री. @Dev_Fadnavis जी,
(1/2) pic.twitter.com/RlPSazC1CG
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 17, 2023
घरमालक राहत असलेल्या मिळकतींना पुणे महापालिकेकडून Pune Municipal Corporation (PMC)
देऊ केलेली, मात्र सन 2018 मध्ये बंद करण्यात आलेली मिळकत करातील 40 टक्के
(Pune PMC Property Tax) सवलत पुन्हा लागू करण्याची मागणी पुणेकरांकडून करण्यात आली होती.
या संदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली.
या बैठकीत पुणेकरांना मिळकत करामध्ये मिळणारी 40 टक्के सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच येणाऱ्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत (Cabinet Meeting) हा प्रस्ताव आणून त्याला मान्यता देण्यात
येणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विशेष म्हणजे फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अगदी शेवटच्या टप्प्यात त्यांनी मिळकत कराची 40 टक्के सूट काढून घेतली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune PMC Property Tax | Good news for Pune residents, 40 percent income tax exemption will continue
हे देखील वाचा :
Sangli Crime | सांगलीत भाजप नगरसेवकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या, परिसरात प्रचंड खळबळ