Pune PMC Election 2022 | प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या जाहीर, सहा प्रभागात महिलांची संख्या अधिक

Pune PMC Hospital Warje Malwadi | Govt gives green light to set up 700 bed multi specialty hospital at Warje

पुणे :  बहुजननामा ऑनलाइनPune PMC Election 2022 | पुणे महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादीनुसार (Ward Prabhag Wise Voter List) सहा प्रभागात महिला मतदार निर्णायक ठरणार आहेत. या प्रभागात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी मतदारसंख्येत 8 लाख 23 हजार 916 मतदारांची वाढ झाली आहे. महापालिका निवडणुकीसाठी (Pune PMC Election 2022) महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाने नुकतेच प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी जाहीर केली आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

या मतदार याद्यांवर 1 जुलैपर्यंत हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. मतदारांनी त्यांची प्रभागनिहाय यादी पाहून नावाची पडताळणी करावी आणि हरकत नोंदवावी असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (Ravindra Binwade PMC) यांनी केले आहे. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी यशवंत माने (Yashwant Mane PMC) हे देखील उपस्थित होते.

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

मतदारांनी नोंदविलेल्या हरकती आणि सूचना वर कार्यवाही करून 9 जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. प्रारुप मतदार यादीत महापालिका (Pune Municipal Election) हद्दीबाहेरील गावांतील मतदारांचा समावेश झाला आहे, तसेच दुसऱ्या प्रभागाच्या यादीत नावे समाविष्ट केली गेल्याच्या तक्रारी येत असल्याकडे बिनवडे आणि माने यांचे लक्ष वेधले असता, बिनवडे म्हणाले, या प्रकारच्या त्रुटी दूर करुन बिनचुक मतदार यादी तयार करण्यासाठीच हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या https://www.pmc.gov.in या संकेतस्थळावर आणि क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी पाहण्यास उपलब्ध आहे. (Pune PMC Election 2022)

 

हरकत कोठे नोंदविणार?
प्रभागाच्या मतदार यादीत आपले नाव आहे का ? हे तपासून मतदारांनी हरकत (Objection) नोंदवावी. ही हरकत लेखी किवा ऑनलाईन स्वरुपात मतदाराला महापालिकेच्या मुख्य निवडणुक कार्यालय, क्षेत्रीय कार्यालयात नोंदविता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने हरकत महापालिकेच्या election@punecorporation.org या ईमेलवर नोंदविता येईल.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

हरकत नोंदविल्यानंतरची प्रक्रिया कशी होणार?
मतदाराने नोंदविलेली हरकत निवडणूक कार्यालयाकडून संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवली जाणार आहे. या हरकतीची पडताळणी करण्यासाठी पथक नियुक्त केले आहे. या पथकामध्ये क्षेत्रीय अधिकारी, अभियंता, लिपीक यांचा समावेश असेल. हे पथक प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन हरकतीची पडताळणी आणि कार्यवाही करून दुरुस्ती करणार आहे.

 

सहा प्रभागात महिला मतदारांची संख्या जास्त
नवीन प्रभाग रचनेनुसार 58 प्रभाग तयार झाले आहे. या प्रभागांची मतदार यादीचे प्रारुप तयार करताना विधानसभा मतदार यादीचा (Assembly Voter List) आधार घेण्यात आला आहे. तसेच निवडणुक आयोगाच्या (Election Commission) आदेशानुसार 31 मे 2022 पर्यंत मतदार नोंदणी केलेल्यांचा समावेश केला आहे. या प्रारूप मतदार यादीनुसार प्रभाग क्रमांक 15 (गोखलेनगर (Gokhale Nagar) – वडारवाडी (Vadarwadi), प्रभाग क्रमांक 16 (फर्ग्युसन कॉलेज (Fergusson College) – एरंडवणे (Erandwane), प्रभाग क्रमांक 17 (शनिवार पेठ (Shaniwar Peth) – नवी पेठ (Navi Peth), प्रभाग क्रमांक 18 (शनिवार वाडा (Shaniwar Wada) – कसबा पेठ (Kasba Peth), प्रभाग क्रमांक 19 (छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीअम (Chhatrapati Shivaji Maharaj Stadium) – रास्ता पेठ (Rasta Peth), प्रभाग क्रमांक 29 (घोरपडे पेठ उद्यान (Ghorpade Peth Udyan) – महात्मा फुले मंडई (Mahatma Phule Mandai) या प्रभागात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. या मतदारसंघाचे भवितव्य महीला मतदारांच्या हाती आले आहे. हे सर्व मतदारसंघ शहराच्या मध्यवर्ती भागातील आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

आकडे काय सांगतात?

 एकुण मतदार : 34 लाख 58 हजार 714

 पुरुष मतदार : 18 लाख 7 हजार 663

 महीला मतदार : 16 लाख 50 हजार 807

– इतर मतदार : 244

 2017 च्या तुलनेत वाढलेले एकुण मतदार : 8 लाख 23 हजार 916

 2017 च्या तुलनेत वाढलेले पुरुष मतदार : 4 लाख 49 हजार 697

 तर 2017 च्या तुलनेत वाढलेल्या महीला मतदार : 3 लाख 74 हजार 042

 2017 च्या तुलनेत वाढलेले इतर मतदार : 177

 सर्वांत जास्त मतदार असलेला प्रभाग : क्रमांक 54 (धायरी – आंबेगाव) 1 लाख 3 हजार 959

 सर्वात कमी मतदार असलेला प्रभाग : क्रमांक 34 ( मगरपट्टा – साधना विद्यालय) 34 हजार 80

 

Web Title :- Pune PMC Election 2022 | Prabhag Ward wise draft voter lists announced, more women in six wards pune pmc election 2022

 

हे देखील वाचा :

Rupali Patil Thombare | …. तर तुमचं घराबाहेर पडणं बंद करु, रुपाली पाटील ठोंबरे यांचा राणेंना इशारा

MPSC | राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा पद्धतीत बदल; MPSC चा मोठा निर्णय

Nitin Gadkari | आता भारतात होणार गाड्यांची क्रॅश टेस्ट, Bharat NCAP ला मंजुरी

Pune Crime | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणातील दोन आरोपींना जामीन