Dr. Neelam Gorhe | महाराष्ट्र विधान परिषदेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सकारात्मक कामांना चालना
डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी तीन वर्षांत महिला अत्याचार, उसतोड कामगार, गिरणी कामगार, शेतकरी महिला, शेतमजूर, राज्यातील विविध देवस्थाने, यावर काम केले. बीड जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात गर्भाशय टाकण्याच्या शस्त्रक्रियांसंदर्भात तपासणी करण्याबाबत त्यांचे काम लक्षणीय आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये आवश्यक त्या सुधारणा आणि आदिवासी भागातही ही योजना लागू करण्याबाबतही त्यांनी आढावा घेतला.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवा महिलांच्या नावे जमीन व्हावी व त्यांना मदत देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली. महसूल विभागासोबत आकारी पड जमिनींचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विवाह नोंदणी व पती पत्नी दोघांच्या नावे जमीन होण्यास मोहिमांचीही शिफारस त्यांनी आरोग्य व महसुलविभागास केली. महाराष्ट्रातील सिनेकलावंत, रंगमंच कलावंत आणि लोककला कलावंत यांना शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा या विषयावरील बैठक, महिलांना सार्वजनिक ठिकाणी शौचालये उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेली बैठका घेतल्या.
पंढरपूर, शिर्डी, लेण्याद्री, कार्ला येथील एकविरा मंदिर आदी ठिकाणी भाविकांसाठी पायाभूत सुविधाांसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नातून या तेथील विकास कामांना गती मिळाली.
भटके विमुक्त आणि उसतोड कामगारांबाबत, ‘आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना ओळखपत्र देण्यासंदर्भात, कल्याणच्या नाट्यगृहात सोयी सुविधा उपलब्ध करण्याबाबत, राज्यातील आरोग्य विभागाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा, कोविड परिस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या व उपाय योजना या विषयांवरही त्यांनी अविरत काम केले.
कोविड काळानंतर नंतर शाळा सुरु करताना घ्यावयाची काळजी आणि त्या अनुषंगाने शालेय शिक्षणबाबतचे इतर विषयांवर त्यांनी पुढाकार घेतला.
शाश्वत विकासाची उद्दिष्टांबाबत केंद्र सरकारने केलेला कृती कार्यक्रम या आणि अशा अनेक विषयांवर राज्य सरकारसोबत वेळोवेळी बैठका घेऊन पाठपुरावा केला आहे.
विदर्भातील स्वयंसेवी संस्थांसोबत आदिवासी भागात वन हक्क कायदा अंमलबजावणी आणि रोजगार हमी योजनेच्या कामात आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या अनुषंगाने राज्य स्तरावरील परिषद त्यांनी घेतली. या परिषदेला रोजगार हमी मंत्री आणि इतर सर्व वरिष्ठ अधिकारी यांना याबाबत आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले.
महिला दक्षता समित्या आणि जात पंचायतीच्या विषयांवर डॉ. गोऱ्हे यांच्या पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra) विशेष शासन निर्णय आणि परिपत्रक देखील प्रसारित केले. तर कोविड काळात बालकांची घ्यायच्या काळजी आणि संरक्षण बाबत मार्गदर्शक सूचना नव्याने तयार करून सामान्य जनतेला उपलब्ध करून दिल्या गेल्या ही बाब विशेष उल्लेखनीय म्हणावी लागेल.
सन 2021 मध्ये स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये कोविड काळात वैधव्य आलेल्या महिलांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून विधान भवनात प्रकाशित केलेल्या ‘स्वयंसिद्धा’ अहवालाच्या माध्यमातून राज्य शासनाला या महिलांचे प्रश्न आणि त्यावर आवश्यक उपाय योजना याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पालघर, नासिक, धुळे, जळगाव, ठाणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, अहमदनगर (संगमनेर),
उस्मानाबाद, लातूर, चंद्रपूर, नागपूर, औरंगाबाद, जालना, कल्याण – नवी मुंबई महापालिका
या सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी जाऊन कोविड काळातील विधवा एकल महिलांसाठी शासकीय स्तरावरील उपाय योजना
बाबत विविध विभागांशी संवाद साधून आढावा बैठका घेण्यात आल्या मराठवाडा विभागात तर विभागीय आयुक्त स्तरावर याबाबत तत्काळ दखल घेत प्रत्येक जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी
यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यात मदत व पुनर्वसन आराखडा तयार करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यामुळे मराठवाडा विभागात या कामाला विशेष गती प्राप्त होत आहे.
प्रत्येक जिल्ह्यात याबाबत विशेष मोहीम हाती घेण्यात येत असून त्यामुळे शासकीय अधिकारी आणि
सर्व शासन यंत्रणा एका सामाजिक जबाबदारीच्या भावनेने या प्रश्नाकडे पाहत आहेत.
रायगड जिल्ह्यातील ३ हजार आदिवासी कुटुंबाना त्यांच्या वन जमिनींचे हक्क मिळवून देण्यासाठी डॉ. नीलम गोऱ्हे
यांचा पुढाकार अत्यंत महत्वाचा ठरला असून पेण परिसरातील आदिवासी भागात कार्यरत असलेल्या
साकव संस्थेच्या माध्यमातून नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात या आदिवासी महिलांना आणि
त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या जमिनींच्या उताऱ्यांचे वाटप डॉ. गोऱ्हे यांनी केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात हेरवाड ग्राम पंचायतीने (Herwad Gram Panchayat)
केलेल्या विधवा प्रथा बंदी ठरावाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष भेट देऊन या गावांचे अभिनंदन त्यांनी केले.
या गावाला महिलांच्या सोयी सुविधांसाठी विकासनिधी म्हणून तातडीने 11 लाख रुपयांचा निधी जाहीर केला.
इतकेच नव्हे तर राज्यभरातील स्वयंसेवी संस्थाना सोबत घेऊन पुण्यात याविषयी एक परिषद घेऊन
हा विषय सर्व गावांनी अनुकरण करण्याचे आवाहन केले.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने यावर एक विशेष परिपत्रक काढून सर्व ग्रामपंचायतीना आवाहन केले आहे.
डॉ. नीलम गोऱ्हे शिवसेनेत सातत्याने आघाडीवर राहून काम करीत आहेत, हे वास्तव आहे.
त्यांच्यामुळे वृत्तवाहिन्यांवर मांडल्या जाणाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेला वजन प्राप्त होत होते.
बहुतांश संतुलित परंतु आवश्यक तेव्हा आक्रमकपणे त्यांनी शिवसेनेवरील टीकेचा प्रतिवाद केला.
शिवसेनेत राहूनही विविध पक्षांच्या नेत्यांशी त्यांनी सलोख्याचे संबंध ठेवले, हे राजकारणातील सौहार्दही विशेष उल्लेखनीय म्हणता येईल.
राजकारणाबरोबरच सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, महिलाविषयक प्रश्नांची जाण असलेल्या
डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासारख्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेल्या
लोकप्रतिनिधी विधानपरिषदेच्या उपसभापती पदी विराजमान झाल्यामुळे विविध क्षेत्रातील प्रश्नांची तड लागणे आज काही प्रमाणात का होईना शक्य झाले आहे.
खरंतर अनेकदा सामाजिक क्षेत्रातून राजकारणात गेलेले लोक समाजकारण याकडे पाठ फिरवतात.
परंतु डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्त्रियांचे प्रश्न हाच आपल्या कामाचा केंद्रबिंदू ठेवला आणि त्यासाठी सातत्याने राज्यभर धावपळ करीत आहेत.
स्त्रीआधार केंद्राच्या माध्यमातून त्यांनी केलेले काम विशेष महत्त्वाचे आहे
आणि त्यांच्यासारख्या लोकप्रतिनिधी विधिमंडळात असणे नेहमीच अन्यायग्रस्त स्त्रियांसाठी दिलासादायक राहिले आहे.
स्त्रियांसंदर्भातील कोणत्याही प्रश्नावर राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केले आहे
हीच त्यांची राज्याच्या राजकारणातील वेगळी ओळख आहे.
Web Title :- Dr. Neelam Gorhe | Promoting the positive work of the State Government through the Maharashtra Legislative Council
Comments are closed.