पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Crime | आपण बाहेर जेवण करण्यासाठी जाऊ तू माझ्याबरोबर बाहेर चल, असे म्हणत ऑफिसमधील सहकारी महिलेला कामावरून काढून टाकण्याची धमकी देत विनयभंग (Molestation) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) मागील दीड वर्षापासून ते 7 डिसेंबर 2022 या कालावधीत पिंपरी येथे घडला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी पीडित महिलेने रविवारी (दि.11) पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 54 वर्षीय आरोपीवर आयपीसी 354, 354 ड, 506, 509 प्रमाणे गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काम करत असलेल्या आरोपीने महिलेला ऑफिसमध्ये बोलावून घेतले.
हस्तांदोलन करण्याच्या बहाण्याने फिर्य़ादीशी गैरवर्तन केले.
तसेच हात पकडून तू एकदा तरी माझ्याबरोबर फिरायला चल असे म्हटले. फिर्यादी यांनी त्याला विरोध केला असता,
त्यांना कामावरून काढून टाकण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Pimpri Crime | you come for a walk with me molested woman in pimpri
हे देखील वाचा :
Pune Pimpri Crime | लुटायला आले अन् चोरटे स्वत:ची गाडी सोडून पळाले…, पिंपरीतील घटना; नेमकं काय घडलं?
Sushma Andhare | ‘चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा मी …;’ सुषमा अंधारेंनी दिली प्रतिक्रिया