पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Crime | लुटण्याच्या उद्देशाने चार जणांनी तरुणांच्या दुचाकीचा पाठलाग केला. तरुणाची दुचाकी अडवून एकाच्या डोळ्यात मिरची पूड (Chili Powder) टाकून दुसऱ्याला चाकूचा धाक दाखवून पैसे आणि दुचाकी घेऊन निघाले. तेवढ्यात तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे चोरट्यांनी (Thieves) तरुणांची दुचाकी सोडलीच शिवाय त्यांची दुचाकीदेखील सोडून पळून गेले. ही थरारक (Pune Pimpri Crime) घटना शनिवारी (दि.10) सायंकाळी सातच्या सुमारास मोरवाडी पिंपरी येथील सुखवानी क्लासिक बिल्डिंगजवळ (Sukhwani Classic Building) घडली.
याबाबत जानी आकाशकुमार विष्णुप्रसाद Jani Akshay Kumar Vishnu Prasad (वय 30, रा. व्हिस्डम पार्क, मोरवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन दुचाकीवरील चार जणांविरुद्ध आयपीसी 393, 34, आर्म अॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र पृथ्वीराज राठोड (Prithviraj Rathod) हे दिवसभर श्री बालाजी टायर दुकानात जमा झालेले दीड लाख रुपये अॅक्टिव्हा गाडीच्या डिक्कीत ठेऊन घरी जात होते.
सुखवानी बिल्डिंग येथे आले असता पाठीमागून आलेल्या दोन दुचाकींवरील चार जणांनी त्यांना आडवले.
चोरट्याने फिर्य़ादी यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून हातावर उलटा कोयता मारला,
तर फिर्यादी यांचा मित्र पृथ्वीराज राठोड याच्या उजव्या हातावर उलटा कोयता मारला.
त्याला कोयत्याचा धाक दाखवून गाडीची डिक्की उघडण्यास सांगितले.
दोन चोरटे गाडी घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना फिर्यादी यांनी जवळच कन्स्ट्रक्शनच्या कामावरील फावडे घेऊन चोरट्यांना मारण्यासाठी त्यांच्या दिशेने धावले.
त्यावेळी चोरटे फिर्यादी यांचा रुद्र अवतार पाहून फिर्यादी यांची दुचाकी आणि स्वत:ची दुचाकी घटनास्थळी सोडून पळून गेले,
तर दुसरे दोन जण दुसऱ्या दुचाकीवरून पळून गेले. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Pimpri Crime | They came to rob and the thieves left their car and ran away…, incident in Pimpri; What exactly happened?
हे देखील वाचा :
Sushma Andhare | ‘चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा मी …;’ सुषमा अंधारेंनी दिली प्रतिक्रिया