पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | गाडी बाजूला न घेतल्याने महिलेला मारहाण (Beating) करुन तिच्यासोबत गैरवर्तन करत विनयभंग (Molestation Case) केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमधील बावधन बुद्रुक (Bawdhan Budruk) येथे घडली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Pune Pimpri Crime) तिन जणांना अटक (Arrest) केली आहे. ही घटना शनिवारी (दि.30) सकाळी दहाच्या सुमारास बावधन बुद्रुक येथील डोमिनोज शॉप (Domino’s Shop) जवळ घडली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पद्मसिंह हेमंत पाटील Padmasinh Hemant Patil (वय-22 रा.सुखवाणी पॅनोरमा, सुसगांव, हिंजवडी मुळ रा. ता. कराड), अनिकेत रामदास हात्ते Aniket Ramdas Hatte (वय-23 रा. आपटे सोसायटी, वारजे माळवाडी), विशाल सदानंद सुटाके Vishal Sadanand Sutake (वय-22 रा. त्रिमती सोसायटी, वारजे माळवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) रविवारी (दि.31) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींवर आयपीसी 354, 324, 323, 504, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहतीनुसार, फिर्यादी महिला त्यांचे काम संपवून घरी जात होत्या. त्यावेळी आरोपी हुंदाई आय 10 गाडीतून (एमएच 12 एस.वाय 6346) जात होते. आरोपींनी जोरात हॉर्न दिला असता फिर्यादी यांनी गाडी बाजूला घेतली नाही. याचा राग आल्याने पद्मसिंह पाटील याने त्याची गाडी फिर्यादीच्या गाडीच्या पुढे नेऊन थांबवली. त्यानंतर फिर्यादीला शिवीगाळ करुन आरीपींनी मारहाण केली. तसेच फिर्यादी सोबत गैरवर्तन करुन त्यांच्या मनास लज्जा निर्माण होईल असे गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुदळ (PSI Ravindra Mudal) करीत आहेत.
Web Title :- Pune Pimpri Crime | Shocking! For not taking the car aside, the woman was beaten and molested, three arrested
हे देखील वाचा :
Shivsena | खरी शिवसेना कुणाची हे निवडणूक आयोगाला ठरवू द्या, एकनाथ शिंदे यांचं प्रतिज्ञापत्र