पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या (Warje Malwadi Police Station) हद्दीत दहशत पसरवणारा अट्टल गुन्हेगार महेश विजय वांजळे याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी आजपर्यंत तब्बल 77 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार महेश विजय वांजळे Mahesh Vijay Wanjale (वय- 28 रा. गणपती माथा, वारजे, पुणे) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे (Criminal) नाव आहेत. महेश वांजळे याला एमपीडीए कायद्यान्वये कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात (Kolhapur Central Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे. (Pune Crime)
महेश वांजळे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तलवार, कोयता, लाकडे दांडके यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), दिवसा व रात्री घरफोडी (Burglary), बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे
केले आहेत. मागील 5 वर्षामध्ये त्याच्याविरुद्ध 4 गंभीर गुन्हे (FIR) दाखल आहेत.
प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महेश वांजळे
याच्यावर एमपीडीए अॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले.
वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके
(Senior Police Inspector Shankar Khatke), पी.सी.बी. गुन्हे शाखा
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी ही
कामगिरी केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Pimpri Crime | case of atrocity has been registered against sudhakar shelke brother of maval ncp mla sunil shelke
हे देखील वाचा :
Pune Crime | बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे पतीनेच केली पत्नीची बदनामी; चंदननगर परिसरातील घटना