पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन –Pune Pimpri Chinchwad Crime | बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन दोन जणांनी तरुणाच्या घरात घुसून वडिलांना मारहाण केली. तसेच हातातील कोयत्याने घरातील सामानाची तोडफोड करुन मुलाला संपवण्याची धमकी दिली. हा प्रकार बुधवारी (दि.14) रात्री सव्वा अकराच्या सुमारास प्राधिकरण निगडी (Nigdi Pradhikaran) येथील रस्टन कॉलनीत घडला. याप्रकरणी निगडी पोलिसांनी (Nigdi Police Station) दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत महिलेने निगडी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.15) फिर्याद दिली आहे. यावरुन प्रणव सुरेश कांबळे (रा. आकुर्डी), हर्षल संजय लोहार (रा. तळेगाव दाभाडे, पुणे) यांच्यावर आयपीसी 452, 323, 504, 506 (2), 427, 34 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती घरात असताना आरोपी प्रणव कांबळे हातात कोयता घेऊन घरात शिरला. त्याच्यासोबत त्याचा मित्र हर्षल लोहार हा देखील घरात आला. त्यांनी फिर्यादी यांचा मुलगा सौरभ कुठे आहे अशी विचारणा केली. माझ्या बहिणीसोबत लफडे करतो काय असे म्हणत फिर्यादी यांच्या पतीला लाथाबुक्क्यांनी व हाताने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करुन हातातील कोयता घरातील टीव्हीवर मारुन नुकसान केले. आरोपी हर्षल लोहार याने तुमचा मुलगा सौरभ याला संपवून टाकतो अशी धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मणेर करीत आहेत.
- ACB Trap Case | जमिनीच्या व्यावसायिक वापराच्या परवानगीसाठी 5 लाखांची लाच घेणारे मुख्याधिकारी, नगररचनाकार जाळ्यात
- Pune Navale Bridge Accident | नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; डंपरची ट्रॅव्हल्सला धडक, अपघातात सात जण जखमी
- Pune Sahakar Nagar Police | व्यसनाच्या आहारी गेलेल्या उच्च शिक्षीत वाहन चोराला सहकारनगर पोलिसांकडून अटक, तीन दुचाकी जप्त
- Pune Crime News | पुणे: कॉलेज तरुणाला गांजाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी ! पोलिसांनीच उकळली 5 लाखांची खंडणी; पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजाळ यांच्यावर FIR