पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार वानवडी परिसरात घडला आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मागील सहा महिन्यापूर्वी वानवडी येथील लुल्लानगर येथील ग्राऊंडच्या कडेला असलेल्या झाडी झुडपात घडला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police ) एकावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत वानवडी लुल्लानगर येथे राहणाऱ्या 18 वर्षीय मुलीने वानवडी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.15) फिर्याद दिली आहे. यावरून मुकेश कुमार मुखिया (रा. डिफेन्स कॉलनी, लुल्लानगर, वानवडी) याच्यावर आयपीसी 376, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(Pune Minor Girl Rape Case)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. सहा महिन्यांपूर्वी पीडित मुलगी तिच्या घराजवळ असलेल्या मैदानावर मित्रांसोबत फुटबॉल खेळत होती. फुटबॉल खेळत असताना बॉल ग्राऊंडच्या कडेला असलेल्या झाडी झुडपात गेला. पीडित तरुणी बॉल आणण्यासाठी गेली. त्यावेळी आरोपीने पीडित मुलीला जबरदस्तीने झुडपात ओढून तिच्या सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.
- Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय, घरात घुसून कोयत्याने तोडफोड
- ACB Trap Case | जमिनीच्या व्यावसायिक वापराच्या परवानगीसाठी 5 लाखांची लाच घेणारे मुख्याधिकारी, नगररचनाकार जाळ्यात
- Pune Navale Bridge Accident | नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; डंपरची ट्रॅव्हल्सला धडक, अपघातात सात जण जखमी
- Pune Sahakar Nagar Police | व्यसनाच्या आहारी गेलेल्या उच्च शिक्षीत वाहन चोराला सहकारनगर पोलिसांकडून अटक, तीन दुचाकी जप्त