बहुजननामा ऑनलाईन
भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. कात्रज परिसरात हा अपघात झाला असून, अपघातात मृत्यू झालेल्याची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी भारती विद्याापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक विशाल मदने यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी सकाळी आठच्या सुमारास कात्रज परिसरातील आंबेगाव येथे वळण मार्गावर भरधाव वाहनाने पादचाऱ्याला धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली.
यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे अंदाजे वय अंदाजे ५० ते ५५ वर्ष आहे. त्याची ओळख पटलेली नाही. तो फिरस्ता असावा, असा संशय पोलिसांना आहे. सहाय्यक फौजदार मोहन देशमुख तपास करत आहेत.