बहुजननामा ऑनलाईन – शहरात घरफोड्या, लूटमार व दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, लोहगाव येथे ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ८० हजारांचे दागिने दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेल्याचा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी 60 वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या लोहगावमधील खेसे पार्क येथे राहायला आहेत. शुक्रवारी सायंकाळी त्या सोसायटीच्या आवारातून निघाल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ८० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. पोलीस उपनिरीक्षक ए. आर. गांधले तपास करत आहेत.