बहुजननामा ऑनलाईन – भारतीय संचार निगम लिमिटेडने आपल्या कॉर्पोरेटायजेशनला २० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वापरकर्त्यांसाठी एक खास भेट आणली आहे. कंपनी ऑक्टोबर महिन्यात कस्टमर डिलाइट मंथ प्रमाणे सेलिब्रेट करणार असून, या पूर्ण महिन्यात वापरकर्त्यांना २५ टक्के जास्तीचा डेटा मिळणार आहे.
BSNL कडून सांगण्यात आले की, कंपनी आपल्या वारकर्त्यांना बेस्ट सर्विस एक्सपिरियन्स देण्याचे काम करणार आहे. तसेच गुरुवारी BSNL कडून नवीन भारत फायबर प्लॅन आणला आहे. हा नवीन प्लॅन डिलाइट मंथ प्रोगामच्या बेनेफिटसोबत मिळतो. नवीन भारत फायबर प्लॅन्समध्ये जबरदस्त ऑफर मिळतात. फायबर बेसिक, फायबर व्हॅल्यू, फायबर प्रीमियर आणि फायबर अल्ट्रा याचा एक भाग आहे. BSNL जास्तीचा डेटा देत वापरकर्त्यांना इतर नेटवर्क जाण्याला रोखण्यासाठी तसेच नवीन ग्राहक जोडण्यासाठी केला जात आहे..
वापरकर्त्यांना मिळणार जास्तीचा डेटा
BSNL ऑपरेटर्स स्पेशल टॅरिफ व्हाउचर्सवर २५ टक्के अतिरिक्त डेटा बेनिटफिट्स देत आहेत. ज्याची वैधता ३० दिवसांहून जास्त आहे. जास्तीच्या डेटा बाबत ऑफर पुढील काही दिवसात सांगण्यात येईल. त्याचा फायदा BSNL च्या वापरकर्त्यांना ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत मिळणार आहे. तसेच कंपनी ऑक्टोबर महिन्यात लँडलाईन कनेक्शन आणि ब्रॉडबँडची सेवा जबरदस्त करण्यावर भर देणार आहेत.