पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune News | पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांच्या पुढाकाराने गत 15 वर्षे वाडेश्वर कट्टा ह्या नावाने विविध क्षेत्रातील मान्यवरांची मैफिल आयोजित करण्यात येते. ह्या वर्षी च्या दिवाळी फराळाच्या निमित्ताने आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अंकुशअण्णा काकडे, श्रीकांत शिरोळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे शहराध्यक्ष नाना भानगिरे, राष्ट्रवादी ( अजितदादा पवार गट ) चे शहराध्यक्ष दीपक मानकर, राष्ट्रवादी ( शरद पवार) गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे शहराध्यक्ष संजय मोरे, आपचे राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार, भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, आरपीआयचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मंदार जोशी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मेघना काकडे माने, इ मान्यवर उपस्थित होते. (Pune News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्याच्या राजकारणाचा स्तर घसरला असून वैयक्तिक टिकाटीप्पनी बरोबरच कमरेखाली वार करणे सुरु आहे अश्या परिस्थितीत ह्या कट्ट्यावर पुण्याची सुसंस्कृत राजकीय संस्कृती आणि सभ्यता जपली जात आहे म्हणून मी या ठिकाणी आलो असे ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.पवार कुटुंबिय दीपावली साजरी करायला एकत्र आले यात काहीच गैर नाही असे सांगतानाच चंद्रकांतदादा पाटील यांनी कर्नाटक मधील जारकीहोळ कुटुंबियांचे उदाहरणं दिले, वेगवेगळ्या पक्षात असूनही व्यवसाय एकत्र करणे, सण एकत्र साजरे करणे यातूनच कटुता संपते असेही ते म्हणाले. (Pune News)
आपल्या स्वभावप्रमाणे नेहमीच्या शैलीत अरविंद शिंदे यांचे टोमणे,प्रशांत जगताप यांची तात्विक भूमिका, दीपक मानकर यांनी केलेले अजितदादांच्या कामाचे कौतुक, विजय कुंभारांचा आमचा झाडू किती स्वच्छ हे सांगण्याचा प्रयत्न, नाना भानगिरे यांची मुख्यमंत्री शिंदे किती संयमाने कामं करतात हे सांगण्याची धडपड,रामदास आठवले कसं सुसंस्कृत हे सांगण्यासाठीचा मंदार जोशी यांचा प्रयत्न आणि अगदी जवळचे मित्र असूनही अंकुश काकडे आणि संदीप खर्डेकर यांचा एकमेकांवर तार स्वरात कुरघोडी करण्याचा प्रयत्न अश्या विविध स्वभाव रंगांच्या उधळणाने हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
चंद्रकांतदादांच्या उपस्थिती मूळे धीरज घाटे मात्र शांत शांत होते.
मोठ्या संख्येने उपस्थित माध्यम प्रतिनिधीनी मात्र मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे
अध्यक्ष ह्या नात्याने दादांवर प्रश्नांचा भडीमार करून त्यांना भांडवून सोडले.
विविध राजकीय विचारसरणीच्या सगळ्यांनी एकत्र येऊन गप्पांचा फड रंगविला व एकत्र वडे, उपमा,
शिरा इ पदार्थांचा आस्वाद घेतला यातच आमचा हेतू सफल झाल्याची भावना अंकुश काकडे यांनी व्यक्त केली.
- Rohit Sharma | हिटमॅन रोहित शर्माचा षटकारांचा वर्ल्ड रेकॉर्ड! क्रिस गेलला टाकले मागे, Video
- Pune News | पुणे : चंद्रकांत पाटील आणि आ. रवींद्र धंगेकर यांना रुपाली चाकणकरांची भाऊबीज
- Supriya Sule | अखेर गोविंदबागेत शरद पवारांच्या पाठिशी दिसले अजित पवार! सुप्रिया सुळेंनी पोस्ट केले फोटो
- ACB Trap News | लाच स्वीकारताना पोलीस हवालदार व झिरो पोलीस अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात