सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – ACB Trap News | गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी दहा हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाणे (Solapur MIDC Police Station) अंतर्गत नई जिंदगी पोलीस चौकीतील पोलीस हवालदारासह झिरो पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Solapur ACB Trap) सापळा रचून अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि.13) सायंकाळी करण्यात आली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलीस हवालदार प्रमोद कांबळे (Police Constable Pramod Kamble) व झिरो पोलीस नागनाथ काळूराम अलकुंटे (Zero Police Nagnath Kaluram Alkunte) अशी लाच स्वीकारताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोन गटात तक्रार झाली होती या तक्रारीचा तपास पोलीस हवालदार कांबळे यांच्याकडे होता. त्यातील एका गटाला सहकार्य करण्याच्या अटीवर कांबळे याने वीस हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती दहा हजार रुपये देण्याचे ठरले होते.
तक्रारदार याने यासंदर्भात सोलापूर एसीबीकडे तक्रार केली. पथकाने सोमवारी पडताळणी करुन सायंकाळी सापळा लावला.
पोलीस हवालदार कांबळे यांच्यावतीने तक्रारदार यांच्याकडून दहा हजार रुपये लाच घेताना
झिरो पोलीस अलकुंटे याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पोलीस हवालदार कांबळे याला ताब्यात घेतले.
दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Pune Crime News | पुणे गोळीबार प्रकरण : सराफावर गोळीबार करुन लुटणाऱ्या चोरट्यांना वानवडी पोलिसांनी दिल्लीतून केली अटक
- Low Blood Pressure | Mental Health बिघडल्यास दिसतात ‘हे’ संकेत, त्यांचाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात..!
- Imbalance Mental Health | Mental Health बिघडल्यास दिसतात ‘हे’ संकेत, त्यांचाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात..!
- Benefits Of Fruits | ‘या’ 5 फळांचा समावेश करा रोजच्या आहारात, होतील अनेक फायदे…
- Winter Food For Diabetic Patients | हिवाळ्यात डायबिटीजच्या रुग्णांनी खा ‘हे’ पदार्थ, ब्लड शुगर राहिल नियंत्रणात..
- Skin Care – Pimples Problem | आजपासून ‘या’ गोष्टी खाणे करा बंद, तुमच्या चेहऱ्यावर कधीच येणार नाही मुरुम आणि वांग…