पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Popular Front of India (PFI) | पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Pune Collector Office) काही युवकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ (Pakistan Zindabad Slogan) आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे (Pune News). शुक्रवारी सायंकाळी पुण्यातील अल्पसंख्यांक समुदायामधील (Minority Communities) काही व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) केलेल्या कारवाईविरोधात घोषणाबाजी केली. (Pune News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पीएफआय विरोधात एनआयएने केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या आंदोलकांना पुणे पोलिसांनी (Pune Police) कुणकुण लागताच आंदोलन (Agitation) सुरु होण्यापूर्वीच ताब्यात घेतले. त्यामुळे हे आंदोलन रद्द करण्यात आले. अनेकांना पोलिसांच्या गाडीमध्ये बसवण्यात आले. (Pune News)
पुण्यात PFI च्या देशद्रोही लोकांच्या अटकेनंतर निघालेल्या मोर्चात पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देणाऱ्या पिलावळीला पोलिसांनी अटक करून गुन्हे दाखल करावेत.
देशद्रोही जिहादी प्रवृत्तीची गय करता कामा नये. @CPPuneCity कठोर कारवाई करावी.@DGPMaharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/2Bhvgt7HeG— Ram Satpute (@RamVSatpute) September 24, 2022
मात्र, यानंतर आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमा झालेल्या आंदोलकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’च्या घोषणा दिल्या. या घोषणाबाजीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी आंदोलकांनी ‘आरएसएस (RSS) मुर्दाबाद’ अशीही घोषणाबाजी केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या घोषणाबाजी प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी रियाज सय्यद (Riyaz Syed) आणि 60 ते 70 पीएफआय
कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. बेकायदेशीरपणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोळा
झाल्याचा उल्लेख पोलिसांनी केला आहे.
या घोषणाबाजीनंतर पोलिसांनी अन्य काही व्यक्तींनाही ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Web Title :- Pune News | video pakistan zindabad slogan allegedly raised in front of pune collector office
हे देखील वाचा :
Pune Crime | विश्वास संपादन करुन 22 लाख रुपये चोरुन नेणार्या महाराजाला स्वारगेट पोलिसांकडून अटक
Dasara Melava 2022 | शिवाजी पार्कवर ‘हसरा मेळावा’, भाजपने उडवली उद्धव ठाकरे यांची खिल्ली