पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | ते शेजारी शेजारी राहणारे. एकाच्या कुत्र्याने दुसर्याची कोंबडी पळवून नेली. त्याचा जाब विचारण्यासाठी गेले असताना कुत्र्याच्या मालकाने जमाव जमवून कोयता, लाकडी दांडक्याने मारहाण (Beating) केली, भांडणे सोडविण्यास गेलेल्यांना हाताने मारहाण करण्यात आली. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी धनंजय बाळासाहेब विरकर Dhananjay Balasaheb Virkar (वय ३१, रा. रुपनगर वस्ती, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५०८/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनिकेत रवींद्र काळभोर Aniket Ravindra Kalbhor (वय २१), रवींद्र काळभोर (वय ५५) यांना अटक (Arrest) केली असून मंगेश काळभोर Mangesh Kalbhor (वय ४२) व त्यांच्या ४ ते ५ साथीदारांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार लोणी काळभोरमधील रुपनर वस्तीमध्ये गुरुवारी रात्री साडेसात वाजता घडला. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धनंजर विरकर आणि अनिकेत काळभोर हे शेजारी राहण्यास आहेत. फिर्यादी यांची कोंबडी अनिकेत काळभोर यांच्या कुत्र्याने पळवून नेली. याची विचारणा करण्यासाठी फिर्यादी गेले असताना आरोपीने त्यांना शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी (Threat) दिली. त्यानंतर सायंकाळी साडे सात वाजता इतरांना जमवून त्यांच्या घरावर हल्ला केला. फिर्यादी यांना कोयता व लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले. त्यावेळी भांडणे सोडवण्यासाठी आलेली त्यांची पत्नी प्राजक्ता व बहिण रुपाली यांना हाताने मारहाण केली. यावेळी त्यांनी शेताच्या बांधाचा जुना वाद उकरुन काढून तसेच घरातील इतर लोकांना जोरात मारुन सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केला, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोरे (Sub-Inspector of Police More) तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title: Pune Crime | The dog ran away the chicken, the owner was brutally beaten by the mob when he went to ask for an answer
हे देखील वाचा :