पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune News | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीमारामन (Union Finance Minister Nirmala Seemaraman) या गेल्या २ दिवसांपासून पुणे दौऱ्यावर (Pune Tour) असून त्यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या कमानीवर काळे फासण्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला आहे. (Pune News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
धनकवडी येथील अहिल्यादेवी चौकात (Ahilya Devi Chowk, Dhankawadi) हा प्रकार घडला आहे. भाजपने (BJP) मिशन बारामती (Mission Baramati) हा कार्यक्रम निर्मला सीतारामन यांना दिला आहे.
त्यादृष्टीने सीतारामन गेल्या दोन दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात
(Baramati Lok Sabha Constituency) फिरत आहेत. खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir) यांच्या घरी सीतारामन या बुधवारी रात्री गेल्या होत्या.
त्यांच्या स्वागतासाठी अहिल्यादेवी चौकात आमदार तापकीर यांच्या वतीने स्वागत कमान लावण्यात आली होती.
या कमानीवरील फ्लेक्सला समाजकंटकांनी काळे फासले आहे.
याबाबत अद्याप कोणीही तक्रार दिलेली नाही. राजकीय वादातून हा प्रकार घडला असावा अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
Web Title :- Pune News | Union Finance Minister Nirmala Sitharaman’s reception arch was blacked out; Incident at Ahilya Devi Chowk in Dhankawadi
हे देखील वाचा :
Maharashtra Cabinet Expansion | दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला पाहिजेत ‘ही’ खाती
Babar Azam-Virat Kohli | बाबर आझमने रिझवानसोबत रचला इतिहास, विराट कोहलीला टाकले मागे